Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Mayour, मुंबई : "देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल", असं वक्तव्य ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी बोलताना घेतलं होतं. त्यानंतर काही वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतलीये. यावेळी मुंबईचा महापौर करण्यासाठी वेगळी गणितं जुळवणार का? या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेत... ते बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं मी म्हणालो. देवाचा म्हणजे देवाचीच..मेवाची (देवेंद्र फडणवीस) नाही. आम्ही हरलोय अशी आमची मानसिकता नाही. कारण ज्या पद्धतीने ती ही निवडणूक लढले. त्याला आम्ही तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे. थोडाफार फरक आहे. आता त्यांना त्यांना टेंशन आहे, फोडून आणलेली माणसं टिकवण्याचं.....कारण टेंशन फोडणाऱ्यांना असतं. आमचा महापौर होईल, असं आकडा दिसत नसला. तरी आम्ही कुठेही खचलेलो नाहीत. त्यांच्या लेखी आमचा पराभव झाला असला तरी आमच्या पराभवाला देखील तेज आहे. त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. ज्यांच्या सहकार्याने महापौर बनवणार आहेत, त्यांना लाज वाटले पाहिजे. बाळासाहेबांचा विचार शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, हा आहे. ती शिवसेना मी बघतोय. गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे, आपण काय करतोय.
हेही वाचा : वहिनीचे अनैतिक संबंध, तिच्यासह प्रियकराची हत्या अन् बहिणीला सुद्धा... शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या वतीने लढवल्या. साम-दाम-दंड-भेदाचा अवलंब त्यांना केला. शिवसैनिकांना तडीपार करण्यात आलं. तरी गुंडागर्दीविरोधात ज्यांनी मतदान केलं. ते खरे लोकशाहीचे खरे रक्षक आहेत. यावेळी मी आणि राज एकत्र आलो, आमची शिवाजी पार्कवर सभा झाली. शिवसेनाप्रमुख होते, तेव्हाही आम्ही एकत्र होतो. त्या व्यासपीठावरुन आम्ही भाषणं केली. आदित्यने देखील भाषण केलं. शिवाजी पार्क कसं फुललं होतं, याचे आपण सर्वजण साक्ष आहात. आमच्याकडे गर्दी जमते, पण मतदान होत नाही. मात्र, त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करु शकतात.. हे न सुटलेलं न उलगडलेलं कोड आहे. एकूणच त्यांनी शिवसेना संपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पैशाचं वाटप केलं. ते वाटप चार दिवसांपुरते नव्हते. ते गेल्या चार वर्षांपासून पैसा पेरत होते. गेल्या चार वर्षात त्यांनी नगरसेवक गळाला लावले होते, ते आता गाळाला गेले. निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कुकर वगैरै वाटण्यात आले. हा पैसा कुठून येतो. त्यामागे ईडी-इनकम टॅक्स मागे कशी लागत नाही.
काळा पैसा थांबावा, यासाठी मोदीजींनी नोटबंदी केली. ही नोटबंदी अयशस्वी झाली का? याचा देखील कोणीतरी शोध घ्यायला हवा. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली पण जमिनीवरची शिवसेना ते कधी संपू शकत नाही. आज जे महिला आणि पुरुष निवडून आले ते एकदम साधे आहेत. पैशाच्या ताकदीपुढे निष्ठा कशी जिंकू शकते? हे याचे उदाहरण आहे. मुंबईकरांकडून अपेक्षा जास्त होती. 25 वर्षात आम्ही सुधारणा केली. कोविड काळात मुंबई मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली. त्यामुळे अधिक आशीर्वाद देतील असं वाटलेलं. मोठ्या प्रमाणात दिले नसले तरी आशीर्वाद आम्हाला नक्कीच दिलेले आहेत. मुंबई महापालिकेत यांनी तिजोरी कशी लुटली? याचा भांडाफोड नक्कीच होईल. आम्ही वचननामा दिला होता, त्याचा आम्ही नक्कीच पाठपुरवठा करु. मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठी वापरली जावी, याचं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांसमोर ठेऊ, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











