मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

Uddhav Thackeray Shiv Sena announces first candidate for the Nagaradhyaksha election : मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

Uddhav Thackeray Shiv Sena announces first candidate for the Nagaradhyaksha election

Uddhav Thackeray Shiv Sena announces first candidate for the Nagaradhyaksha election

मुंबई तक

09 Nov 2025 (अपडेटेड: 09 Nov 2025, 11:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता पहिला उमेदवार

Sindhudurg News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काही दिवसांपूर्वी उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेने देखील त्यांचा नगराध्यक्षपदासाठीचा राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केलाय. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत सीमा मठकर यांना पसंती मिळाली असून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर संघटक निशांत तोरस्कर , शहर प्रमुख शैलेश गवंढळकर, माजी तालुकाप्रमुख उमेश कोरगावकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

हे वाचलं का?

सीमा मठकर यांची प्रतिक्रिया

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर म्हणाल्या, मी गेली दोन दशके समाजकारणाच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात परिचित आहे. माझे सासरे माजी आमदार दयानंद मठकर यांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने मी काम करणार आहे. सुसंस्कृत शहराची ओळख एक विकासात्मक ओळख कायम टिकवण्यासाठी मी निवडणुकीत उभी राहणार आहे. सावंतवाडीकरांनी मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने स्वबळाच्या दृष्टीने तयारी केली आहे. जर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमच्या सोबत आले तर निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू.. पण सद्यस्थितीत आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु आहे आहे. मनसेनेलाही सोबत घेतले जाईल, असंही ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा : लोन वसूलीसाठी मुंबईतील रिकव्हरी एजंटचं घाणेरडं कृत्य! ग्राहकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून व्हायरल...

महायुतीतही अंतर्गत कलह सुरुच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणांना आता अधिक वेग आला आहे. भाजपने आधीच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय स्पष्ट केला असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही त्याच दिशेने तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. याचदरम्यान, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्याने राजकारण तापलंय. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि विरोधक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तगडी स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.

“आम्ही स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी केली आहे, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे भाजप शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून मोहिनी मडगावकर हे देखील दावेदार असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कृतघ्नपणाचा कळस, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला धीर द्यायचं सोडा, राधाकृष्ण विखे पाटलांनी बळीराजाची मापं काढली

    follow whatsapp