Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत 28 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसरकारला खडेबोल सुनावलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यावरून सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. नाशिकमधील साधूंसाठी बनवण्यात येणाऱ्या साधूग्रामवरून त्यांनी सरकारला झापलं आहे. एवढंच नाहीतर ते म्हणाले की, सरकार कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जमीन घालत आहेत. यांचं 'मुँह में राम और बगल में अदानी असं यांचं हिंदुत्व आहे आणि आम्ही अशा हिंदुत्वाला मानत नाही, असं म्हणत त्यांनी सरकारच्या विकास कामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लबाड लांडगा..! भ#वा म्हणत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ, संतोष बांगर यांची जीभ घसरली
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'हे सर्वच चित्र भयानक आहे, यापैकी दोन चित्र फार महत्त्वाचे आहे. मुंबईतील हवामान दूषित झालं आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आरे जंगलाच्या कार शेडला स्थगिती दिली होती. आम्ही मेट्रोला कसलाही विरोध केलेला नव्हता, आम्ही कांजुरमार्गची जागा सुचवली होती पण आता ती जागा सरकारने घेतली आहे. आरेची झाडे छाटून टाकलेली आहे, याचमुळे नियोजन शून्य विकासामुळे विकासच दिसत नाही, हा जो काही कॉन्ट्रॅक्टरचा विकास करण्यासाठी आटापिटा सुरु आहे त्यांचाच विकास होतोय'.
नाशिकमधील कुंभमेळ्यावरून सरकारला झापलं
'माझ्या आणखी एक कानी आलेलं आहे की, संजय गांधी नॅशनल पार्कच्या नावाखाली असंच सुरु आहे', शहरातील हे एकमेव जंगल आहे तिथं अनेक प्राण्यांचे संग्रहालय केलेलं आहे. असाच प्रकार नाशिकमध्ये देखील दिसून येत आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होता, तिथे येणाऱ्या असंख्य साधूंची कुठेतरी गैरसोय होऊ नये यासाठी सरकारची जबाबदारी असते. अशातच आता नाशिकचा पालकमंत्री का नेमला जात नाही? हे एक कोडंच आहे. अशातच साधूंसाठी साधूग्राम होणार आहे, मागील वेळी ते कुठे झालं याची माहिती सहज मिळू शकते. पण, नाशिकचे तपोवन नष्ट करण्यात येणार आहे. याच तपोवनाला श्रद्धेचं ठिकाण करायला हवं होतं. याच तपोवनाला साधूग्राम करण्यात येईल, ती झाडे कापून साधूंसाठी साधूग्राम करणार असाल तर गेल्या वेळी जी जागा वापरण्यात आली होती ती जागा का वापरली जाणार नाही?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे.
कॉन्ट्रॅक्टर म्हणून अदानी हा एक शब्द..
'कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात आलं असलं, तरी त्या ठिकणी कॉन्फरन्स सारख्या गोष्टी केल्या जाणार आहेत. सर्व हिंदुत्त्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी झाडं कापली जात आहेत. त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जात आहे. 'मुँह मे राम आणि बगल मे अदानी' अशी स्थिती निर्माण झाली असून कॉन्ट्रॅक्टर म्हणून अदानी हा एक शब्द निर्माण झालेला आहे. कुंभमेळ्याचं कारण सांगून झाडे कापून कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जाईल. याच कारणासाठी जनता ओरडते, पण त्या जनतेचं कोणीही ऐकत नाही.'
हे ही वाचा : हाताला मेहंदी लागली होती, सनई चौघडे वाजत होते, वरात सुरु असताना नवरदेवाच्या कारने आपल्याच वडिलांना चिरडले
मुँह में राम और बगल मे अदानी' असं यांचं हिंदुत्त्व
'मंत्री नुसते गरागरा फिरताहेत, हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत, ना धड शहरातील नागरिकांचं ऐकत, हा सर्व पैसा येतो कुठून?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. 'मित्र पक्षातून हे समोर आलेलं आहे. एकमेकांवरती धाडी टाकून सर्व दाखवलं जातंय, तरी चिडीचुप आहेत, त्यामुळेच मुँह में राम और बगल मे अदानी' असं यांचं हिंदुत्त्व असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला चांगलंच फटकारलं.
ADVERTISEMENT











