हाताला मेहंदी लागली होती, सनई चौघडे वाजत होते, वरात सुरु असताना नवरदेवाच्या कारने आपल्याच वडिलांना चिरडले

मुंबई तक

Viral News : विवाह सुरु असताना एक दु:खद घटना घडली. नवरदेवाच्या मुलाच्या गाडीखाली पाहुणे चिरडले गेले, त्यातच नवरदेवाच्या वडिलांचाही समावेश असल्याची धक्कादायक घटना आहे.

ADVERTISEMENT

viral news
viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नसोहळा सुरु असताना भीषण अपघात 

point

अपघातात वराचे वडील गाडीखाली चिरडले

point

विवाहाचं पुढं काय?

Viral News : विवाह म्हणजे वर आणि वधुंप्रमाणेच दोन्ही गटातील मंडळींसाठी अगदी आनंदाचा दिवस असतो. याच लग्नकार्यामुळे संसाराची सुरुवात होते आणि आयुष्यभर वाट पाहणाऱ्या सिंगल व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार मिळतो. पण, याच सनई चौघडे वाजण्याच्याच दिवशी विरजण निर्माण झाल्याने होत्याचं नव्हतं होऊल बसलं, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. अशीच एक घटना आता ओडिशात घडली आहे. येथे वराच्या वडिलांचा लग्नातच मृत्यू झाला आहे. या घटनेनं शुभकार्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हे ही वाचा : लबाड लांडगा..! भ#वा म्हणत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ, संतोष बांगर यांची जीभ घसरली

लग्नसोहळा सुरु असताना भीषण अपघात 

घरात विवाह सोहळा सुरु असतानाच एक भीषण अपघात घडला. या अपघातात चक्क वराच्या पतीचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणात बेलपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मंडल गावानजीक भागात वराची कार वेगाने आली आणि वरातीत नाचत असलेले काहीजण कारखाली चिरडले गेले. त्यात वराच्या वडिलांचा देखील समावेश असून त्यांचा मृत्यू झाला. 

अपघातात वराचे वडील गाडीखाली चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, वधूचे कुटुंब हे लोइसिंह पोलीस ठाणे हद्दीतील अमपाली गावातून लग्नासाठी मंडळी गावात पोहोचले होते. तेव्हा रात्रीच्या सुमारास सुरु वरात सुरु झाली आणि ढोल-ताशांच्या गजरात नातेवाईक वराच्या कारसमोरच नाचू लागले होते. तेव्हा वराला घेऊन येणारी कार अचानक समोर आली आणि त्याखाही काही वऱ्हाडी चिरडले गेले. त्यातच वराचे वडील गिभूल बाग यांचा जागीच मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : Astrology : काही लोकांना मिळणार कुटुंबाची साथ, तर काहींना करिअरमध्ये मिळणार यश, पण 'या' राशींचं खरं नाही

आनंदाच्याच दिवशी शोककळा 

या मन हेलावणाऱ्या घटनेनं कुटुंबात आनंदाच्याच दिवशी शोककळा पसरली होती. या लग्नात दोन्ही कुटुंबांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कारण या विवाहातच अनेक समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती कुटुंबीयांना होती. हा दु:खाचा प्रसंग सुरु असताना त्यांनी लग्नाचे विधी पूर्ण करून घेतले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp