Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज (28 जून) त्यांनी फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मोठा दावा केला. फडणवीस यांचे पंख त्यांच्याच बॉसकडून कापले जात असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. तसेच हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचा पुनरुच्चार केला.
ADVERTISEMENT
पक्षातलं गटबाजीचं राजकारण?
ठाकरे म्हणाले की, 'पूर्ण देशात मोदींची लाट होती, राम मंदिर बांधलं होतं, तरी देखील महाराष्ट्रातील मतदारांनी मोदींच्या विरोधात मतदान केलेले खासदार आज परत त्यांच्या पायाशी लीन झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? महाराष्ट्र धर्म मारण्याचा हा प्रकार करताहेत. म्हणून काल जे मी बोललो की वरवरचा हा प्रकार समजू नका. यामागे खूप मोठं राजकारण आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला. खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्यकडे नाही, गटबाजी भाजपमध्ये चाललीये. कारण हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे.'
हे ही वाचा : सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला, स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO
फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार
यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असून त्यांचे पंख कापले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'मध्यप्रदेशमध्ये भाजप शिवराज सिंग यांच्या चेहऱ्यावर निवडणुका जिंकला. सगळे त्यांना प्रेमाने मामा म्हणायचे. पण त्यांनाच मामा बनवलं. त्यांच नामोनिशानच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. आता शिवराज यांचं नावच नाही कुठे? जो-जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत.'
हे ही वाचा : अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याचं भयंकर पाऊल
फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर?
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 26 जून रोजी मुंबई ते नागपूर एकत्र विमानप्रवास केला. याविषयी सगळीकडे चर्चा झाली. त्या प्रवासाविषयी आणि फडणवीसांविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, 'काल-परवा माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस विमानात बसले होते. पण हतबल बसले होते. कळतच नव्हतं हे मुख्यमंत्री आहेत. आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापले जाताहेत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? दार उघडलं की पंख कापणार. मग जे काही वाचलंय तेवढे दिवस ढकलेले बरे या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आहेत. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर?'
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून गडकरींचे पंख असे कापले की त्यांच्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं. आता नितीन गडकरी काही करु शकत नाहीत.'
ADVERTISEMENT











