'मला टीम इंडियातील खेळाडूला मारायचंय...', मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

Abrar Ahemed Satement : पाकिस्तानी खेळाडूने टीम इंडियातील एका बॅट्समनला मारहाण करू वाटल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे. असं वक्तव्य करणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून पाकिस्तानी खेळाडू अबरर अहमद असे आहे. 

abrar ahemed controversial satement

abrar ahemed controversial satement

मुंबई तक

06 Oct 2025 (अपडेटेड: 06 Oct 2025, 09:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मला टीम इंडियातील खेळाडूला मारायचंय...

point

पाकिस्तानच्या खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

Abrar Ahemed Satement : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघादरम्यान झालेल्या नुकत्याच सामन्याने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या अशिया कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघादरम्यान झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या कृत्याने आणि वर्तनाने अशिया कप चांगलाच चर्चेत राहिला. अशिया कप विजयी होऊनही आता पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना पराभव पचवता आला नसल्याचं चित्र आहे. अशातच आता पाकिस्तानी खेळाडूने टीम इंडियातील एका बॅट्समनला मारहाण करू वाटल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे. असं वक्तव्य करणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून पाकिस्तानी खेळाडू अबरर अहमद आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विरार हादरलं! अज्ञातांनी पहाटे तीनच्या सुमारास मुलीसह आई वडिलांवर चॉपरने केले वार, तिघेही रक्ताच्या थारोळ्यात, हल्ल्याचं कारण काय?

मुलाखतीदरम्यान काय म्हणाला अबरार अहमद? 

अबरार अहमदला एका मुलाखतीदरम्यान, विचारले की, जगात असा कोणता खेळाडू आहे ज्याच्यासोबत तुला बॉक्सिंग खेळायला आवडेल? कोणाचा तुला जास्त राग येतो? या प्रश्नावर अबरारने उत्तर दिलं की, 'मला बॉक्सिंग करायचंय आणि माझ्यासमोर शिखर धवन उभा असायला हवा', असं त्याने उत्तर दिले. त्याने दिलेल्या या उत्तराची जोरदार चर्चा होताना दिसते. 

टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला सोशल मीडियावर चांगलंच सुनावले होते. त्या दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमकी होताना दिसतात. शिखर धवनने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ सलेजजेंड्स स्पर्धेत पाकिस्तान संघाविरोधात खेळण्यास नकार दिला होता. तेव्हा पाकिस्तानच्या संघात शाहिद आफ्रिदीसह इतर अनेक दिग्गजांचा भरणा असल्याचं सांगण्यात येतं.

अशिया कप 2025 चर्चेत 'या'कारणाने चर्चेत

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघादरम्यान होणाऱ्या प्रत्येक सामन्याला ऐतिहासिक सामना म्हणूनच बघितलं जातंय. नुकताच झालेला अशियाई टी 20 विश्वचषक अनेक कारणाने चर्चेत राहिला होता. टीम इंडियाचा कर्णधार सुर्य कुमार यादवच्या शेक हँडमुळे चर्चेत राहिला तर कधी शाहिबजादा इरफानने बॅटने केलेल्या कृतीमुळे हा कप चर्चेत राहिला. 

हे ही वाचा : 61 वर्षीय पुरुषाला बाई आणि बाटलीचा नाद, महिलेला खोलीत नेलं, नंतर दोघांमध्ये वाद उफळला असता तिला पेटवून दिलं

टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते चषक घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोहसीन नक्वी हे कप घेऊन तिथून निघून गेले. अशिया कपची सांगता होऊनही अद्यापही दोन्ही देशात ताणावाची परिस्थिती आहे. अशातच सोशल मीडियावरती अबरार अहमद या पाकिस्तानी खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

    follow whatsapp