Ind vs Aus : केएल राहुल की शुभमन गिल? तिसऱ्या कसोटीत कुणाला मिळणार संधी?

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी (4 Tes Series ) सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून (बुधवार) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून अजेय आघाडी (Lead) मिळवण्याचे लक्ष्य असेल. तिसऱ्या कसोटीतही चाहत्यांच्या नजरा (Indian Team Playing 11) भारतीय संघाच्या प्लेइंग-11 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:53 AM • 28 Feb 2023

follow google news

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी (4 Tes Series ) सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून (बुधवार) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून अजेय आघाडी (Lead) मिळवण्याचे लक्ष्य असेल. तिसऱ्या कसोटीतही चाहत्यांच्या नजरा (Indian Team Playing 11) भारतीय संघाच्या प्लेइंग-11 इलेव्हनवर असतील. केएल राहुलला (KL Rahul) संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Whether KL Rahul gets a chance or not

हे वाचलं का?

KL Rahul च्या खराब कामगिरीवर सौरव गांगुली स्पष्टचं बोलला

केएल राहुल अतिशय खराब फॉर्ममध्ये असून त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी सराव सत्रादरम्यान गिल आणि राहुलने एकत्र फलंदाजीचा सराव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये राहुलला फलंदाजीत काही खास करिष्मा करता आला नाही आणि तीन डावात त्याला केवळ 38 धावा करता आल्या. खराब फॉर्ममुळे केएल राहुलला कसोटीतील उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

दोन्ही फलंदाजांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली दोन नेटवर सुमारे 30 मिनिटे फलंदाजी केली. संघ व्यवस्थापनाला राहुलच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि ते त्याला अतिरिक्त संधी देत ​​आहे, परंतु प्रत्येक अपयशाने फलंदाजावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे, गिलने सध्याच्या हंगामात सर्व फॉरमॅटमध्ये छाप पाडली आहे आणि माजी क्रिकेटपटूंसह त्याच्या चाहत्यांना असे वाटते की त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही.

शुभमन गिलने सराव करताना अटॅकिंग खेळ केला. तर राहुलने डिफेन्सवर अधिक लक्ष दिले. राहुलने पहिले 18 चेंडू डिफेन्सिव्ह प्रॅक्टिस केली. नंतर फिरकीपटूंविरुद्ध हवेत शॉट्स खेळले. त्यानंतर त्याने गिलसोबत जागा बदलून रविचंद्रन अश्विनचा सामना केला. यादरम्यान त्याने सरळ बॅटने फलंदाजी केली.

केएल राहुलला मुख्य प्रशिक्षक द्रविड यांचे खूप सहकार्य लाभले आहे. द्रविड म्हणाला होता, ‘मला वाटतं की, राहुलला त्याच्या प्रोसेसवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. हा फक्त एक टप्पा आहे. तो परदेशातील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक आहे. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतके झळकावली आहेत. आम्ही त्याला बॅक करत राहू. केएल राहुलने 47 कसोटी सामने खेळून 33.44 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Ind vs NZ: शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी; द्विशतक झळकावत बनला नंबर वन!

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी. , मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

    follow whatsapp