WPL 2023 : मुंबईची विजयी आरंभ, गुजरातला 143 धावांनी चारली धूळ

मुंबई तक

• 09:54 PM • 04 Mar 2023

WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये, हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने (MI) विजयासह धमाकेदार सुरुवात केली. स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी मुंबईतील (DY Patil Stadium) डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई संघाने 143 धावांनी विजय मिळवला. Mumbai Indians Women team won by 143 runs महिला […]

Mumbaitak
follow google news

WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये, हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने (MI) विजयासह धमाकेदार सुरुवात केली. स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी मुंबईतील (DY Patil Stadium) डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई संघाने 143 धावांनी विजय मिळवला. Mumbai Indians Women team won by 143 runs

हे वाचलं का?

महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना

या सामन्यात हरमनप्रीतची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात तिने 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर गुजरातचा संपूर्ण संघ 64 धावांवर बाद झाला. म्हणजेच गुजरात संघाला हरमनच्या स्कोअरची बरोबरीही करता आली नाही. तसं बघायला गेलं तर गुजरात संघाला हरमनकडूनही पराभव पत्करावा लागला.

मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 5 विकेटवर 207 धावा केल्या होत्या. या सामन्यात हरमनप्रीत 30 चेंडूत 65 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत 14 चौकार मारले. याशिवाय हेली मॅथ्यूजने 47 आणि अमेलिया केरने 45 धावा केल्या.

T-20 World Cup: पराभवानंतर ढसाढसा रडली हरमनप्रीत, चाहत्यांनाही अश्रू अनावर

208 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना गुजरातचा संपूर्ण संघ 15.1 मध्ये 9 गडी गमावून 64 धावा करू शकला. अशाप्रकारे गुजरातचा संघ 143 धावांनी पराभूत झाला. गुजरात संघाची कर्णधार बेथ मुनी रिटायर झाली होती, जी नंतर फलंदाजीसाठी मैदानावर आली नाही.

तर मुंबई संघाकडून गोलंदाजीत सायका इशाकने 3.1 षटकात 11 धावा देत 4 बळी घेतले. सायकाशिवाय मुंबई संघाकडून अमेलिया केर आणि नेट-सिव्हर ब्रंटने 2-2 विकेट घेतल्या.

हरमनप्रीतने सलग 7 चौकार मारले

संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुजरात संघाविरुद्ध 22 चेंडूत धडाकेबाज अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान हरमनने दोन गोलंदाजांचा क्लास लावताना सलग 7 चेंडूंवर चौकार मारले. मोनिका पटेलच्या डावातील 15 व्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंवर हरमनने सलग चार चौकार लगावले.

यानंतर, 16 वे षटक अॅशले गार्डनरने टाकले. ज्याच्या दुसऱ्या चेंडूवर हरमनला स्ट्राइक मिळाला. या 16व्या षटकात स्ट्राइक मिळताच हरमनने पुन्हा सलग तीन चौकार मारले आणि झटपट धावा केल्या. या सामन्यात हरमनप्रीत 30 चेंडूत 65 धावा करून बाद झाली.

    follow whatsapp