काय सांगता! 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 नव्हे, 500 रुपये मिळणार, यादीत तुमचं नाव आहे का?
Ladki Bahin Yojana Latest News : राज्याच्या तिजोरीवर आलेला भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आली समोर
 
 लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या कमी का होणार?
 
 राज्य सरकारवर किती रुपयांचं कर्ज आहे?
Ladki Bahin Yojana Latest News : राज्याच्या तिजोरीवर आलेला भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल केला आहे. या बदलामुळे योजनेच्या माध्यमातून 8 लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत. सरकारच्या नियमानुसार, ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत नाहीय, त्यांनाच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहे. तसच ज्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीतूनही 1000 रुपयांचा लाभ मिळत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 500 रुपयेच मिळणार आहेत.
राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या जोरावर पुन्हा सत्तेत आलं. दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. राज्य सरकारवर आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा दबाव आहे. परंतु, सरकारला त्यांच्या मुख्य योजनेलाही चालवायचं आहे.
हे ही वाचा >> कामाची बातमी: तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय, चुटकीसरशी बुक होईल तुमचं तिकीट
राज्य सरकारवर किती रुपयांचं कर्ज आहे?
राज्यावर 2025-26 पर्यंत 9.3 लाख कोटी रुपयांचं कर्ज असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे 46000 कोटी रुपयांमध्ये घट करून 36000 कोटी रुपये केले आहेत. त्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होत गेली.
सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हे यामागचं उद्देश आहे. या योजनेसाठी ऑक्टोबरमध्ये जवळपास 2.63 कोटी अर्जांची नोंद करण्यात आली होती. छाननी केल्यानंतर या नोंदणीत 11 लाखांनी घट होऊन 2.52 कोटींवर पोहोचली होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फक्त 2.46 लाख महिलांना पैसे मिळाले.














