मे एण्डिंगला सोनं रडवणार! गोल्ड रेटमध्ये झाली प्रचंड वाढ, 24 कॅरेेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबई तक

Gold Rate Today : अमेरिकी डॉलरमध्ये तेजी आणि मार्केटध्ये सोन्याची वाढत्या मागणीमुळे आज शुक्रवारी 30 मे 2025 रोजी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok AI)
Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : अमेरिकी डॉलरमध्ये तेजी आणि मार्केटध्ये सोन्याची वाढत्या मागणीमुळे आज शुक्रवारी 30 मे 2025 रोजी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 0.08 टक्क्यांनी सोन्याच्या किंमती वाढल्याचं समोर आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढणार असल्याचं एक्सपर्टचा अंदाज आहे. 

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97 हजारांच्या पुढे गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89 हजारांपार झाले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97190 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89950 रुपये झाले आहेत. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 99900 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती..

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp