बडतर्फ IAS पूजा खेडकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, घरातील नेपाळी नोकर मोबाईल घेऊन पळाला
Dismissed IAS officer Pooja Khedkar News : खेडकर कुटुंबाकडे काम करणाऱ्या एका नोकरानेच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित नोकराने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने डॉ. पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवत घरातील मोबाईल फोन घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बडतर्फ IAS पूजा खेडकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं
घरातील नेपाळी नोकर मोबाईल घेऊन पळाला
Dismissed IAS officer Pooja Khedkar News : आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडकर यांनी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरात चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, बाणेर रस्त्यावरील खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शनिवारी (दि.10 जानेवारी 2026) रात्री घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिसांकडे देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडकर कुटुंबाकडे काम करणाऱ्या एका नोकरानेच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित नोकराने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने डॉ. पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवत घरातील मोबाईल फोन घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील संशयित नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळमधून पुण्यात आला होता, अशी माहितीही पोलिसांकडून समोर आली आहे. तो काही दिवसांपासून खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात काम करत होता. घटनेच्या वेळी घरात इतर कोणी उपस्थित नव्हते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेनंतर डॉ. पूजा खेडकर या बांधलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी दाराच्या कडीचा वापर करून स्वतःला सोडवून घेतले. त्यानंतर घरात उपलब्ध असलेल्या दुसऱ्या मोबाईल फोनवरून त्यांनी चतुःश्रृंगी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.










