सोलापूर : रागाच्या भरात बापाने पोटच्या जुळ्या मुलांचा विहिरीत ढकलून जीव घेतला, पश्चाताप झाल्याने स्वत:ही विष प्यायला

मुंबई तक

Solapur Crime : करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी व वीज कंपनीत म्हणून कर्मचारी असलेले सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32) याने घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून भयंकर कृत्य केलंय.

ADVERTISEMENT

Solapur Crime
Solapur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : रागाच्या भरात बापाने पोटच्या जुळ्या मुलांचा विहिरीत ढकलून जीव घेतला

point

पश्चाताप झाल्याने स्वत:ही विष प्यायला

Solapur Crime : बापाने पोटच्या सात वर्षांच्या जुळ्या चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून देऊन दोघांचा जीव घेतल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात शनिवारी (दि.10,जानेवारी) सकाळी घडली. किरकोळ वादातून दोन निष्पाप चिमुकल्यांनी जीव गमावल्याने केत्तूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : काळीज पिळवटणारा व्हिडीओ, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा मृत्यू, आईसह 8 तासांच्या लेकीने घेतले अंत्यदर्शन; महाराष्ट्र हळहळला

पोटच्या मुलांचा विहिरीत ढकलून जीव घेतला 

अधिकची माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी व वीज कंपनीत म्हणून कर्मचारी असलेले सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32) याने घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून भयंकर कृत्य केलंय. किरकोळ वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पोटच्या शिवांश सुहास जाधव व श्रेया सुहास जाधव या दोन चिमुकल्या मुलांना हिंगणी (ता. करमाळा) येथील शेतात नेले व तेथेच त्यांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर सुहास यांनीच काही वेळाने स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील सर्वजण विहिरीकडे धावत आले. मात्र, तोपर्यंत दोनही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

बापाने पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन केले

या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडून मृत्यू झालेली जुळी बहीण-भाऊ आहेत. या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुहासने आपल्या जुळ्या मुलांना कोणत्या कारणामुळे मारले? याप्रकरणी पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली. संशयित सुहास जाधव याने मुलांना विहीरीत ढकलून देत हत्या केल्यानंतर पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp