Lord’s Mark Industries च्या दमदार Listing ची चर्चा; कोण आहेत प्रशांत करुळकर?

मुंबई तक

Lord’s Mark Industries चे 10 जुलै 2026 रोजी BSE Main Board वर लिस्टिंग झाले. या लिस्टिंग प्रक्रियेत गुंतवणूकदार प्रशांत करुळकर यांची भूमिका काय होती आणि कंपनीचा प्रवास कसा घडला, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

lords mark industries listing prashant karulkar strategy
कोण आहेत प्रशांत करुळकर?
Google CTA

मुंबई: भारतीय भांडवली बाजारात Lord’s Mark Industries च्या लिस्टिंगची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबईतील रणनीतीकार आणि गुंतवणूकदार प्रशांत करुळकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Lord’s Mark Industries ने BSE Main Board वर सूचीबद्ध असलेल्या Kratos Energy & Infrastructure Ltd या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी NCLT अंतर्गत प्रक्रिया सुरू केली होती. IBC प्रक्रियेद्वारे झालेल्या या रिव्हर्स मर्जरनंतर कंपनीचा इक्विटी बेस सुमारे 10 लाख शेअर्सवरून जवळपास 42 कोटी शेअर्सपर्यंत वाढला.

10 जुलै 2026 रोजी Lord’s Mark Industries चे शेअर बाजारात लिस्टिंग झाले. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरमध्ये सलग 10 ट्रेडिंग सत्रांमध्ये अपर सर्किट पाहायला मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणि दलाल स्ट्रीटवर या कंपनीची मोठी चर्चा झाली.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO डॉ. सचिदानंद हरिराम उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, SEBI कडून लिस्टिंग आणि ट्रेडिंगला मंजुरी मिळवताना अनेक कायदेशीर आणि नियामक अडचणी निर्माण झाल्या होत्या.