Personal Finance: Lock FD म्हणजे काय, नेमका कसा मिळतो प्रचंड फायदा?
Lock FD: लॉक एफडी हे नवं फीचर सुरू करण्यात आले आहे. हे फीचर विशेषतः वृद्धांसाठी आणि डिजिटल फसवणुकीची भीती असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Lock FD: पैसे गुंतवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. (Fixed Deposite) असे बरेच लोक आहेत जे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये म्हणजेच एफडीमध्ये (FD) पैसे गुंतवतात कारण ते सुरक्षित बचत आणि चांगले व्याज मिळविण्याचा एक मार्ग आहे.
पण डिजिटल बँकिंगच्या युगात, ऑनलाइन फसवणुकीची भीती देखील कायम आहे. परंतु अॅक्सिस बँकेने (Axis Bank) एक नवीन एफडी फीचर आणले आहे. त्याचे नाव लॉक एफडी (Lock FD) आहे. हे फीचर तुमच्या एफडीला ऑनलाइन गरज नसताना उगाचच जे पैसे काढले जातात त्यापासून बचाव करतं.
म्हणजेच, सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर तयार केला जातो. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की ते काय आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, चला तर याचविषयी आपण Personal Finance या आपल्या विशेष सदरातून जाणून घेऊया.
Lock FD फीचर म्हणजे काय?
जर तुम्ही लॉक एफडी फीचर चालू केले, तर तुमची एफडी इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे कोणत्याही प्रकारे उघडता येणार नाही. तुम्हाला फक्त बँकेच्या शाखेत जाऊन तुमची ओळख पडताळणी करावी लागेल आणि त्यानंतरच ही एफडी तुम्ही बंद करू शकता. ही सुरक्षा विशेषतः ऑनलाइन बँकिंगमध्ये नवीन असलेल्या किंवा डिजिटल फसवणुकीची भीती असलेल्यांसाठी महत्त्वाची आहे.










