Personal Finance: महिन्याला 5000 वाचवण्यासाठी 10 Practical उपाय, आजपासूनच करा सुरुवात!

रोहित गोळे

महिन्याला 5,000 रुपये वाचवण्यासाठी जीवनशैली पूर्णपणे बदलण्याची गरज नाही. उलट, लहान-लहान खर्चांवर नियंत्रण, नियमित Budgeting आणि पगाराच्या दिवशी बचत या तीन गोष्टी सातत्याने केल्या तर आर्थिक शिस्त लावता येते.

ADVERTISEMENT

personal finance save 5000 per month 10 practical money saving tips for middle class
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Google CTA

महिन्याचा पगार आला की घरभाडे, EMI, किराणा, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, प्रवास आणि इतर खर्चांमध्ये मोठा हिस्सा जातो. त्यामुळे महिन्याच्या शेवटी बचतीसाठी फारशी रक्कम उरत नाही. मात्र, मोठी कमाई होण्याची वाट पाहण्याऐवजी रोजच्या खर्चात छोटे बदल केले, तर महिन्याला 5000 रुपयांपर्यंतची बचत करणे शक्य होऊ शकते. यासाठी खर्च बंद करण्यापेक्षा अनावश्यक खर्च ओळखणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

1. बाहेरच्या चहा-कॉफीचा खर्च कमी करा

दररोज ऑफिसमध्ये चहा, कॉफी किंवा नाश्त्यासाठी 50-100 रुपये खर्च होत असेल, तर महिन्याला सहज 1,500 ते 3,000 रुपये खर्च होऊ शकतो. आठवड्यात काही दिवस घरून चहा-कॉफी किंवा नाश्ता नेल्यास हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येईल.

2. OTT आणि Subscription तपासा

Netflix, Prime Video, YouTube Premium, Music Apps, Cloud Storage अशा अनेक Subscriptionचे पैसे दर महिन्याला आपोआप कट होतात. महिन्यातून एकदा सर्व Subscriptionची यादी करा. वापरात नसलेल्या सेवा बंद केल्यास 300 ते 1,000 रुपये किंवा त्याहून अधिक बचत होऊ शकते.

3. Online Shoppingसाठी ‘24 तासांचा नियम’

ऑनलाइन Shopping करताना दिसलेली प्रत्येक वस्तू लगेच खरेदी करू नका. आवश्यक नसलेल्या वस्तूसाठी किमान 24 तास थांबा. दुसऱ्या दिवशीही ती वस्तू आवश्यक वाटत असेल तरच खरेदी करा. Impulse Shopping कमी झाल्यास महिन्याच्या बजेटवर मोठा फरक पडू शकतो.