Exclusive: 17 तास ED ची धाड, सूरज चव्हाणचे WhatsApp चॅट्स आले समोर
शिवसेना (UBT) नेते सूरज चव्हण यांच्या घरी 17 तास ईडीचा छापा सुरू होता. याच छापेमारीत ईडीला नेमकं काय मिळालं याची Exclusive माहिती मुंबई Tak च्या हाती लागली आहे.
ADVERTISEMENT

Marathi News Breaking: मुंबई: मुंबईत (Mumbai) काल अंमलबजावणी संचलनालय (ED) ने 10 ते 12 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. आज सुद्धा धाडींचे सत्र सुरू आहे. ज्यांच्यावर काल ईडीने धाडी टाकल्या होत्या ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) जे आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय समजले जातात. त्याच सूरज चव्हाण यांच्या राहत्या घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट देखील घेतली आहे. ज्या ठिकाणी 17 तास ईडीचा छापा सुरू होता. याच छापेमारीत ईडीला नेमकं काय मिळालं याची Exclusive माहिती मुंबई Tak च्या हाती लागली आहे. (17 hours ed raid suraj chavan whatsapp chats covid centre scam shiv sena ubt aaditya thackeray mumbai tak exclusive)
17 तासांच्या धाडीत ED च्या हाती काय लागलं?
ईडीची जी चौकशी झाली त्यात असं आढळून आलं आहे की, मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोविड काळात मृतदेहांना सील करण्यात ज्या बॅग विकत घेण्यात आल्या होत्या त्या बॅग खरेदीत महापालिकेकडून मोठा घोटाळा झाल्याचं ईडीच्या चौकशीतून समोर आलं आहे.
मृतदेह सील करण्यासाठी जी बॅग होती त्याची मूळ किंमत ही दोन हजार रुपये होती. ती एक बॅग बीएमसीने 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> ‘डिलिव्हरी बॉय’चे काम करून MPSCची तयारी; राहुल हंडोरे इतका क्रूर का झाला?
याशिवाय अनेक गोष्टींमध्ये अनियमितता झाली असल्याचं ईडीच्या छापेमारीतून समोर आलं आहे.