Thane : कळव्यातील ‘त्या’ रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT

Kalwa hospital news : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात खळबळ उडाली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर 5 तास आयसीयूमध्ये उपचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
ठाणे महापालिकेचे कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. हे रुग्णालय रुग्णांच्या मृत्युमुळे चर्चेत आले आहे. मिळालेल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वेगवेगळ्या वार्डातील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 13 रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते. तर 4 रुग्ण हे सामान्य वार्डात उपचार घेत होते.
…तर हे घडलं नसतं, आव्हाड संतापले
17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. “आज (13 ऑगस्ट) सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
वाचा >> ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास
आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.
आज… pic.twitter.com/7mAhAnOJiL
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 13, 2023