मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात अर्टिगा कारचा चक्काचूर, पाच जण ठार तर तीन जखमी

अपघातात जखमी झालेल्या दोघांना नवी मुंबईतल्या रूग्णालयात करण्यात आलं दाखल
5 died, 3 critically injured after a car hit another vehicle today morning on Mumbai Pune Expressway near Khopoli area
5 died, 3 critically injured after a car hit another vehicle today morning on Mumbai Pune Expressway near Khopoli areaफोटो सौजन्य-ANI

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अर्टिगा या कारचा भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की या अपघातात अर्टिगा कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर झाला आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात अपघात झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नवी मुंबईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अर्टिगा या कारचा जो चक्काचूर झाला आहे त्यावरूनच अपघात किती भयंकर आहे हे लक्षात येतं आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर अपघात झाल्याने वाहतूक कोंडीही झाली होती.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

अब्दुल रहमान खान

अनिल सुनील सानप

वसीम साजिद काझी

राहुल कुमार पांडे

आशुतोष नवनाथ गाडेकर

मच्छिंद्र अंबोरे असं कारचालकाचं नाव असून तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत तसंच बचावकार्य सुरू केलं. अपघातग्रस्त कार ऱस्त्यावरून हटवण्यात आली आहे. तसंच जखमींना नवी मुंबईतल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in