Amol Kolhe : ‘…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’, कोल्हेंचा फडणवीसांना इशारा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

onion price news : amol kolhe attacked on devendra fadnavis. kolhe warned to modi government.
onion price news : amol kolhe attacked on devendra fadnavis. kolhe warned to modi government.
social share
google news

Amol Kolhe devendra fadnavis Onion export duty : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात कर वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, खासदार अमोल कोल्हेंनी माघार न घेण्याचा देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय.

परदेशात पाठवल्या जाणाऱ्या कांद्यावर केंद्राने 40 टक्के निर्यात कर लागू केला. त्यामुळे कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्राने 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

फडणवीसांचा अमित शाहांना फोन

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी अमित शाहांनी त्यांना या निर्णयाची माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Onion Price : ‘वाजपेयींचं सरकार पडले म्हणून इतके घाबरता का?’, बच्चू कडू मोदी सरकारवर कडाडले

फडणवीस म्हणाले की, “केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल”, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

मागे हटणार नाही, अमोल कोल्हेंचा इशारा

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी टीका केलीये. हा निर्णय उशिरा घेतल्याचे सांगत आता स्वस्थ बसणार नाही, असे कोल्हे म्हणाले.

ADVERTISEMENT

“देवेंद्रजी, जेव्हा शेतकरी बांधव प्रतिक्विंटल 300/400 रुपयाने कांदा विकत होते, तेव्हाच तुम्ही प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव दिला असता तर शेतकरी बांधवांना सुद्धा फायदा झाला असता! पण दुर्दैव म्हणजे 4 वर्षे माझ्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नव्हते! त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे की आम्हाला प्रतिक्विंटल 4000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा कोल्हेंनी दिलाय.

ADVERTISEMENT

अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे खासदार डॉ अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या रास्ता रोको मध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले.

अजित पवार गटाकडून निर्णयाचं स्वागत

अजित पवार गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. “केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असून या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो”, असे भुजबळ म्हणाले.

वाचा >> Chandrayaan-3 Landing in Evening: चांद्रयान-3 चे लँडिंग तिन्ही सांजेलाच का, अंधारात उतरणार विक्रम?

“कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येवल्यासह राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून नक्कीच फायदा होणार आहे. यासंदर्भात प्रतिसाद देऊन केंद्राशी संपर्क साधल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार”, असे म्हणत भुजबळांनी फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे श्रेय दिलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT