औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद, अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पुरातत्व खात्याचा निर्णय
औरंगाबादजवळच्या खुल्दाबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. अशात या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करण्याचं काम गेल्या पाच पिढ्यांपासून एकाच घराण्याकडे आहे. त्या निसार घराण्यापैकी खादीम निरास अहमद यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या नावावर होणारं […]
ADVERTISEMENT

औरंगाबादजवळच्या खुल्दाबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. अशात या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करण्याचं काम गेल्या पाच पिढ्यांपासून एकाच घराण्याकडे आहे. त्या निसार घराण्यापैकी खादीम निरास अहमद यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या नावावर होणारं राजकारण योग्य नाही. औरंगजेबाने ५० वर्षे भारतावर राज्य केलं. आपल्या आयुष्यात टोप्या शिवून आणि कुराणाचंही लेखन त्याने केलं आहे. जनतेचे पैसे औरंगजेबाने वापरले नाहीत. टोप्या विकून आणि इतर कामं करून जे पैसे मिळतील त्यात ते आयुष्याची गुजराण करत होते.
औरंगजेबाने त्याच्या मुलाच्या नावे जे मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं, त्यात हे स्पष्ट केलं होतं की जे पैसे मी माझ्या मेहनतीने मिळवले आहेत त्याचा उपयोग माझी कबर बांधण्यासाठी करावा. औरंगजेबाच्या कबरीवरून काहीही कारण नसताना राजकारण सुरू आहे असं या निसार कुटुंबाचं म्हणणं आहे.