आमदार लक्ष्मण जगताप यांची झुंज संपली, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP Mla) लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांची मृत्यूसोबतची झुंज संपली. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लक्ष्मण जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. (BJP Mla Laxman jagtap passed away after prolonged illness) आमदार लक्ष्मण जगताप यांना दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्यावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP Mla) लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांची मृत्यूसोबतची झुंज संपली. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लक्ष्मण जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. (BJP Mla Laxman jagtap passed away after prolonged illness)

आमदार लक्ष्मण जगताप यांना दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराच्या मदतीने लक्ष्मण जगताप यांची मृत्यूसोबत झुंज सुरू होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली. मात्र, परत प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी (3 डिसेंबर) लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली.

लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर पिंपरी गुरव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp