Viral News: बॉयफ्रेंडने प्रपोज केल्यानंतर गर्लफ्रेंड थेट 100 फूट खोल दरीत पडली!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Not long after a boyfriend proposed to his girlfriend, a terrible incident happened to them. In which the young woman lost her life. in turkey
Not long after a boyfriend proposed to his girlfriend, a terrible incident happened to them. In which the young woman lost her life. in turkey
social share
google news

Girlfriend Death: तुर्की: एका जोडप्यासोबत एक अशी घटना घडली आहे की, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसेल. त्याचं झालं असं की, एका मुलीला तिच्या प्रियकराने (Boyfriend) प्रपोज केलं. पण त्याचवेळी अचानक मुलीचा पाय टेकडीवरून घसरला आणि ती थेट 100 फूट खाली दरीतच कोसळली. हे प्रकरण तुर्कीचे आहे. (boyfriend proposed his girlfriend
after girl slips from cliff and dies in turkey)

नेमकी घटना काय?

येसिम डेमिर (वय 39 वर्ष) ही आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी तिचा बॉयफ्रेंड निजामेटिन गुरसु याच्यासोबत एका उंच टेकडीवर गेली होती. त्यांनी मावळत्या सूर्यासोबत एक छान फोटो देखील काढला. पण त्याचवेळी गर्लफ्रेंड येसिम हिचा अचानक टेकडीवरून पाय सरकला आणि ती थेट दरीत पडली. ही घटना 6 जुलै रोजी घडली.

तिच्या भावी पतीने तिला नुकतेच प्रपोज केले होते. यानंतर तो खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणण्यासाठी आपल्या गाडीकडे गेला तेव्हा त्याला एक मोठी किंकाळी ऐकू आली. गुरसू धावत परत आला तेव्हा त्याला कळले की त्याची गर्लफ्रेंड ही टेकडीवरून खाली पडली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?

स्थानिक मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, दोघांनी एंगेजमेंटसाठी ही टेकडीवरची जागा निवडली होती. कारण त्यांना ही जागा रोमँटिक आहे असं वाटलं गुरसू म्हणाला, ‘प्रपोज केल्यानंतर आमच्या आठवणी रोमँटिक असाव्यात म्हणून या जागेची निवड केली होती. आम्ही थोडी दारू देखील प्यायलो. पण सगळं एकाच झटक्यात घडलं. तिचा तोल बिघडला आणि ती खाली पडली.’

येसिम टेकडीवरून खाली पडली तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण नंतर तिचा मृत्यू झाला. गुरसू मदतीसाठी ओरडत राहिला. दरम्यान, येसिमवर 45 मिनिटे उपचार सुरू होते पण नंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sangli: ‘त्या’ महिलेच्या घरात असतानाच गुंड सच्या टारझनची आधी बोटं तोडली अन्..

येसिमच्या मित्रांचे म्हणणे आहे की, जिथे अपघात झाला तिथे बरेच लोक मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी जातात. ते म्हणाले की, ‘ही अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण येऊन सूर्यास्त पाहतो. पण इथले रस्ते खूप खराब आहेत आणि टेकडीच्या बाजूला बचाव करण्यासाठी काहीही नाही. याठिकाणी टेकडीवर कुंपण असावे आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला जावा. दरम्यान, येसिमच्या मृत्यूनंतर टेकडीवरील लोकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासन आता अधिक तपास करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT