मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौऱ्यातल्या दरे गावात केली शेताची मशागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दरे गावात केली शेताची मशागत
Chief Minister Eknath Shinde cultivated a field in Dare village during his visit to Satara
Chief Minister Eknath Shinde cultivated a field in Dare village during his visit to Satara

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मूळगाव असलेल्या दरे या गावात आज त्यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करत शेताची मशागत देखील केली. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करत गवती चहा, हळद आणि चंदनाच्या झाडांची पाहणी केलीये. हातात कोळपणी मशीन घेऊन त्यांनी हळद पिकांची मशागत केली आहे. यावेळी त्यांच्या शेतामध्ये असलेल्या मत्स्य तळ्यातील माश्यांना त्यांनी खाद्य देखील दिले आहे. राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतःच्या शेतात राबत आहेत.

शेतीची आवड आहे असंही म्हणाले मुख्यमंत्री

"शेतीची आवड आहे. आमचे आजोबा, वडील शेतकरी आहेत. आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. माझा जन्म इकडेच झाला. मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा झाडे लावणं, शेतीची मशागत करणं असे अनेक कामं करत असतो. मी माझ्या आजोबांबरोबर, वडिलांसोबत शेतीत काम केलंय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“आता मुलगा श्रीकांतही त्यात सहभागी होतोय. श्रीकांतने इकडे खूप वेगवेगळ्या पिकांची लागवड केलीय. श्रीकांतने हळद, तसेच अनेक औषधी वनस्पतींची लागवड केलीय. काजू, आंबे, मोसंबी, संत्रा अशी अनेक फळांची लागवड केली आहे”, असं शिंदे म्हणाले

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in