Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच परतला
राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ मृतदेह आढळलेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूप्रकरणा वेगळे वळण लागले आहे. दर्शनाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ मृतदेह आढळलेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूप्रकरणा वेगळे वळण लागले आहे. मित्रासोबत राजगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. आता पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला असून, त्यात दर्शनाचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्या हत्येच्या संशयाची सुई तिच्या मित्राकडे असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी असलेली दर्शना पवार नुकतीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती राज्यातून सहावी आली होती. दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणूनही निवड झाली होती.
हेही वाचा >> अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांना बाल्लेकिल्ल्यातच धक्का!
एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा पुण्यातील एका स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणाऱ्या संस्थेकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने दर्शना पवार ही 9 जून रोजी पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरातील एका मैत्रिणीकडे ती राहत होती.
12 जून रोजी राजगडला गेली अन्…
दरम्यान, 12 जून रोजी दर्शना पवार ही आपण सिंहगड किल्ल्यावर जात असल्याचे मैत्रिणीला सांगून घराबाहेर पडली होती. दर्शनाने तिच्या कुटुंबीयांनाही याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर ती राहुल दत्तात्रय हांडोरे या मित्रासोबत राजगड किल्ल्यावर फिरायला निघून गेली.