'50 खोके एकदम ओके'च्या घोषणा अन् काळे रुमाल; मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकरी का भडकले?

धुळ्यातील कासारे गावातील घटना: संतप्त शेतकऱ्यांनी दादा भुसेंच्या समोर घोषणाबाजी करत दाखवले काळे रुमाल
'50 खोके एकदम ओके'च्या घोषणा अन् काळे रुमाल; मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकरी का भडकले?

कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे हे शनिवारी (३ सप्टेंबर) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कासारे गावात विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात दादा भुसे हे व्यासपीठावर आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं आणि ५० खोके आणि एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या.

'50 खोके एकदम ओके'च्या घोषणा अन् काळे रुमाल; मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकरी का भडकले?
'५० खोके-एकदम ओके, मोकळं सांगून दिलेलं बरं...'; असं का म्हणाले गुलाबराव पाटील?

दादा भुसे यांच्या कार्यक्रमात शेतकरी का चिडले?

राज्यात सत्तांतर होण्याआधीच अनेक भागात प्रचंड पाऊस झाला होता. धुळे, नाशिक जिल्ह्यातही पावसांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री होते. झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही.

याच मुद्द्यावरून काही शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी दादा भुसे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

'50 खोके एकदम ओके'च्या घोषणा अन् काळे रुमाल; मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकरी का भडकले?
'खोके कुठे जातात, माझ्याकडे सगळा हिशोब! बोलायला भाग पाडू नका'; एकनाथ शिंदेंचा दुसऱ्यांदा इशारा

दादा भुसेंसमोर संतप्त शेतकरी काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक आमदार बोलत नाही. शेतकऱ्याचा कांदा सडून गेला, त्यावर कुणीही बोललं नाही. तुमचं बरोबर भरून गेलं, ५० खोके एकदम ओके', असं शेतकरी म्हणाले. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कांद्याला योग्य भाव दिला जावा यासह विविध मागण्या शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्यासमोर केल्या. दरम्यान, घोषणाबाजी करणारे शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.

दादा भुसे काय म्हणाले?

रस्त्यासाठी तीनशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पावसाळा संपला की काम सुरू होईल. सध्या कांद्याला १००० ते १२०० भाव मिळतो आहे. मागच्या काळात ६०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव दिला गेला होता. या विषयासंदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी, यासाठी पाठपुरावा करतो आहोत", असं दादा भुसे शेतकऱ्यांना म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in