Gunaratna Sadavarte : “मराठा तरूणांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न”, पाटलांचा गंभीर आरोप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gunaratna sadavarte vandlized car mangesh sable arrested advocate vinod patil reaction
gunaratna sadavarte vandlized car mangesh sable arrested advocate vinod patil reaction
social share
google news

Gunaratna Sadavarte vandlize car Vinod Patil Reaction : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची आज सकाळी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तोडफोडी प्रकरणी मंगेश साबळे (Mangesh sable)  यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तरूण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचा आरोप होतोय. या घटनेने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. या सर्व घडामोडींवर आता वकील विनोद पाटील (Vinod Patil) यांनी मराठा समाजातील तरूणांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (gunratna sadavarte vandlized car mangesh sable arrested advocate vinod patil reaction)

वकील विनोद पाटील हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. गाड्या तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर हल्ला चढवत मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाची व्याख्या विचारली होती. ही व्याख्या आता विनोद पाटलांनी सांगितली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची व्याख्या संपूर्ण देशाने पाहिलीय. सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल असे मोर्चे काढले. लढाईचा इतिहास आणि संख्येने मोठे असलो तरी शांततेत लढलो, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आम्ही विसरलो नाहीत,असे विनोद पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा : रोडरोमियोंना अद्दल! पोलिसांनी अशी दिली शिक्षा, मुलींची छेडछाड आली अंगलट

विनोद पाटील पुढे म्हणाले, एका कार्यकर्त्याने स्वत:च वाहन जाळून घेतलं, त्याचा राग आपण बघितला. पण त्या कार्यकर्त्याला समाजावर होत असलेले हल्ले, विचित्र वक्तव्ये सहन झाली नाहीत, त्यामुळे त्याने हा निषेध नोंदवला. याचा अर्थ हे सेंट्रलाईज प्लानिंग आहे का? याचा अर्थ आम्ही ठरवून करतो का? तर मराठा समाज असे कदापी करणार नाही, आम्ही कायम शांततेत आंदोलन करतो, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच कुठेतरी आम्हाला (मराठा समाजाला) परत एकदा दहशतवादी असल्याच्या चौकटीत उभं करण्याचा केविलवाणा प्रयत्न सूरू असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला. यावर पत्रकाराने मराठा तरूणांना दहशतवाद्याच्या चौकटीत उभं केलं जातंय का? असा सवाल केला. हो निश्चित केले जातेय असे विनोद पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

शांततेच्या मार्गाने आम्ही आरक्षण मागतोय, न्यायालयीन लढाई लढतोय, उपाशी आंदोलन करतोय, ते करत असताना आमच्या एका मराठा तरूणाने हे कृत्य केले, गाडी फोडणे हे चुकीचेच आहे, परंतू कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे देखील आवश्यक असल्याचे मत विनोद पाटील यांनी मांडले.संपूर्ण मराठा समाज हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे आणि तो कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतो. याचाच अर्थ कोणत्या तरी दिशेने हे आंदोलन नेण्याचा प्रयत्न सूरू असल्याचेही मोठं विधान विनोद पाटील यांनी केले आहे. पण आम्ही सक्षम,भक्कम असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

मंगेश साबळे हा मराठा क्रांती मोर्चातील गुणवंत आणि क्रियाशील कार्यकर्ता आहे. मागे त्याने स्वतःची गाडी पेटवून आंदोलन केले होते. तो लढवय्या कार्यकर्ता आहे, त्याला आम्ही सर्वोतोपरी मदत करू, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे राहू, असे देखील विनोद पाटील यांनी सांगितले. तसेच मराठा तरूणांनी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करावे, कायदा तोडू नका, असे देखील आवाहन विनोद पाटलांनी केले.

ADVERTISEMENT

गुणरत्न सदावर्ते प्रसिद्धीसाठी मराठा समाजाला टार्गेट करतायत अशी टीका देखील विनोद पाटील यांनी केली. तसेच अशा वृत्तीला विनाकारण पोलिस सरंक्षण देऊन त्यांना व्हिआयपी कॅटेगरीत गणण्याचा प्रयत्न होतोय, ही गोष्ट योग्य नसल्याचे देखील पाटील यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT