Thane: भयानक! 7 कामगारांचा जीव घेणारी लिफ्ट 40 व्या मजल्यावरून कशी कोसळली?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Thane lift collapses from 40th floor 7 people Died
Thane lift collapses from 40th floor 7 people Died
social share
google news

Thane Lift Collapsed : महाराष्ट्रातील ठाणे येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्ट अपघातात सात कामगारांचा भयानक मृत्यू झाला. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा अपघात झाला. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास छतावरील वॉटरप्रूफिंगचे काम आटोपून कामगार 40 मजली इमारतीतून खाली येत होते. त्यानंतर अचानक लिफ्टची सपोर्टिंग केबल तुटली. (In Thane lift collapses from 40th floor 7 people Died)

बाल्कम परिसरातील रुणवाल कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीत हा अपघात घडला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ स्थानिक अग्निशमन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली. या अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरितांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लिफ्टमध्ये एकूण सात जण होते आणि या सर्वांचा मृत्यू झाला आहे.’

उद्धव ठाकरेंना आता घरकोंबडा म्हणावं लागेल कारण…; बावनकुळे का संतापले?

मृतांमध्ये 32 वर्षीय महेंद्र चौपाल, 21 वर्षीय रूपेश कुमार दास, 47 वर्षीय हारून शेख, 35 वर्षीय मिथलेश, 38 वर्षीय करिदास आणि 21 वर्षीय सुनील कुमार दास यांचा समावेश आहे. सातव्या मृताची ओळख पटलेली नाही. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्ट 40 व्या मजल्यावरून तिसऱ्या पार्किंगच्या मजल्यावर पडली.’

Prakash Raj : आधी ‘सनातन धर्माला म्हणाले, टनाटन, आता…’, काय बोलले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं, ‘ठाण्यातील लिफ्ट दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.’

ADVERTISEMENT

लिफ्ट कशामुळे पडली याचा शोध घेतला जात आहे. ध्रुव वुलन मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, निवासी प्रकल्प चालवणारी कंपनी, एका मीडिया स्टेटमेंटमध्ये सांगितले की, ‘लिफ्टचे सतत निरीक्षण केले जात होते आणि सध्याचा वार्षिक मेंटेनन्स कराराच्या अंतर्गत सर्व्हिस केली जात होती. 23 ऑगस्ट रोजी लिफ्टचा शेवटचा मेंटेनन्स केला गेला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Kalyan Crime : मित्रांनीच केला घात, फुस लावून रूमवर नेलं आणि…अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी सांगितले की, ‘दोन दिवसांपूर्वी लिफ्टची दुरुस्ती करून बनावट प्रमाणपत्र देण्यात आले होते. बराच वेळ झाला तरी पोलीस किंवा अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा दावा त्यांनी केला.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT