Kolhapur : हायवेवर होर्डिंग लावत प्रेयसीला प्रपोज, प्रियकराचा नादखुळा अंदाज चर्चेत

कोल्हापुरातल्या मुलाने सांगलीतल्या मुलीला केलं अशा अनोख्या पद्धतीने प्रपोज
Kolhapur : हायवेवर होर्डिंग लावत प्रेयसीला प्रपोज, प्रियकराचा नादखुळा अंदाज चर्चेत
kolhapur youth saurabh kasabekar propose to utkarsha kamble for marriage on Road Hording

कोल्हापूरचा एक तरूण सध्या चर्चेत आहे. त्या तरूणाचं नाव आहे सौरभ कसबेकर. या तरूणाने त्याच्या प्रेयसीला ज्या स्टाईलमध्ये प्रपोज केलंय त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा हा हटके फंडा चर्चेत आहे. सौरभ आणि सांगलीतली मुलगी उत्कर्षा हे दोघंही बुधगाव सांगलीमध्ये वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉज या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिकत होते.

सौरभ आणि उत्कर्षा शेवटच्या वर्षापर्यंत एकमेकांना नीट ओळखत नव्हते. मात्र इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सौरभच्या घरातल्या त्याल्या त्याच्या मनात कुणी असेल तर सांग आपण रितसर मागणी घालू हे सांगितलं. तेव्हा सौरभने उत्कर्षा नावाची मुलगी आपल्याला आवडत होती असं सांगितलं. ठरल्या प्रमाणे सौरभच्या घरातल्यांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरातले हो-नाही, हो-नाही करत होते. उत्कर्षानेही होकार दिला नव्हता. मग काय कोल्हापूरच्या या तरूणाने एक हटके फंडा आजमवला.

सौरभने उत्कर्षाला चक्क हायवेवर भलंमोठं होर्डिंग लावून प्रपोज केलं. कोल्हापूर सांगली रोडवर त्याने ५० बाय २५ या आकाराच्या होर्डिंगमध्ये उत्कर्षा मॅरी मी-सौरभ असं लिहून उत्कर्षाला प्रपोज केलं. या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर उत्कर्षानेही होकार दिला. मग काय दोघांनी या होर्डिंग समोर एकत्र येत फोटोही काढला. त्यानंतर हे फोटो आणि या होर्डिंगची चर्चा फक्त कोल्हापुरातच नाही तर सोशल मीडियावर रंगली.

उत्कर्षा आणि सौरभ या दोघांचं लग्न २७ मे रोजी होणार आहे. अनोख्या पद्धतीने प्रपोज करून लग्न होत असल्याने कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कुणी प्रेमपत्र लिहितं, कुणी गिफ्ट पाठवून प्रपोज करतं किंवा कुणी आणखी काही पद्धत वापरतं. प्रत्येक जण आपलं प्रपोज हटके कसं ठरेल? या प्रयत्नात असतो. अशात कोल्हापूरच्या तरूणाने केलेलं हे अनोखं प्रपोज सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे. दोघांच्या घरातलेही या लग्नासाठी तयार होतेच. आपल्याला आवडणाऱ्या मुलीला सौरभने हटके पद्धतीने प्रपोज केलं आहे. रोडवर भलं मोठं होर्डिंग लावत त्यावर Marry Me Utkarsha असं लिहिलं आहे. रस्त्यावरचं हे भलं मोठं होर्डिंग चर्चेत आहे आणि प्रपोज करण्याचीही सौरभची ही पद्धतही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in