पुण्यातल्या इंदापूरजवळ विमान क्रॅश, २२ वर्षीय महिला पायलट थोडक्यात बचावली
पुण्यातल्या इंदापूरजवळ एका विमानाचा अपघात होऊन ते क्रॅश झालंय. या घटनेत २२ वर्षांची महिला पायलट थोडक्यात बचावली आहे. हे दोन सीटचं विमान होतं. इंदापूरमधल्या शेतात या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं. पुणे जिल्ह्याचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली की हे ट्रेनी एअरक्राफ्ट होतं. हे विमान Carver aviation कंपनीचं होतं. हे विमान २२ […]
ADVERTISEMENT

पुण्यातल्या इंदापूरजवळ एका विमानाचा अपघात होऊन ते क्रॅश झालंय. या घटनेत २२ वर्षांची महिला पायलट थोडक्यात बचावली आहे. हे दोन सीटचं विमान होतं. इंदापूरमधल्या शेतात या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं. पुणे जिल्ह्याचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली की हे ट्रेनी एअरक्राफ्ट होतं. हे विमान Carver aviation कंपनीचं होतं.
हे विमान २२ वर्षीय वैमानिक भाविका राठोड चालवत होती. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने तिला हे विमान शेतात लँड करावं लागलं. या घटनेत ती जखमी झाली आहे. मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. भाविकाला आता नवजीवन रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात शिकाऊ विमान क्रॅश झाल्याची घटना नेमकी काय?
कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भविका राहुल राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषध उपचारांसाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले असून ईतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे.