Maharashtra Rain: पुण्यासह चार जिल्ह्यांना IMD कडून इशारा, ठिकठिकाणी दाणादाण
live rain news in maharashtra today : ऐन होळी आणि धुळवड उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात […]
ADVERTISEMENT

live rain news in maharashtra today : ऐन होळी आणि धुळवड उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालं असून, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईच्या फळबागांचे प्रचंड नुकसान झालं आहे.
चार जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने 8 मार्च रोजी राज्यातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 मार्च रोजीही अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यांत पाऊस होण्याचा शक्यता आहे.
Forecast issued by imdmumbai for next five days…
पुढील पाच दिवसांसाठी आयएमडीमुंबईने जारी केलेला अंदाज… pic.twitter.com/B8K5RkDnCy— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 7, 2023