ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास
सुधीर लोखंडे नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कंपनीचा डीजीएम आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

-विकास राजूरकर, चंद्रपूर
Chandrapur News : ‘माझ्या खिशात 1000 रुपये आहेत. अंत्यसंस्कार करा’, असं सांगत दोन मुलांच्या बापाने गळफास घेतला. ही ह्रदयद्रावक घठना घडलीये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सुधीर लोखंडे असे आहे. सुधीर लोखंडेंनी आत्महत्या करण्याचं कारण सुसाईड नोटमधून समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या बल्लारपूरमधील विद्यानगर वॉर्डात सुधीर लोखंडे हे कुटुंबासोबत राहायचे. सुधीर लोखंडे हे बल्लारपूर पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. जवळपास नऊ महिन्यांपूर्वी त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले होते. यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाला होते.
वाचा >> Sana khan : ‘…नदीत फेकला मृतदेह’, भाजप पदाधिकारी हत्या प्रकरणाची Inside Story
दरम्यानच्या काळात, सुधीर लोखंडेंच्या आईची तब्येत बिघडली. त्यामुळे आधीच आर्थिक समस्यांनी त्रस्त असलेल्या सुधीर लोखंडेंना मानसिक त्रास सुरू झाला. ते नैराश्यात गेले आणि घरातच आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.