राज ठाकरे आमचे पाहुणे; इम्तियाज जलील यांच्याकडून मनसे अध्यक्षांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनी राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी मनसेला 16 अटी व नियम घालून दिले आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना आपल्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे. माझा धर्म, माझी […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनी राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी मनसेला 16 अटी व नियम घालून दिले आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना आपल्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.
माझा धर्म, माझी संस्कृती आणि मला लहानपणापासून मिळालेली शिकवण हेच सांगते की राज ठाकरे आमचे पाहुणे आहेत. ते आमच्या शहरात आले आहेत, त्यामुळे सभेला जाण्याआधी मी त्यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रीत केलं आहे. सभेत भाषणासाठी उभे राहिले असताना राज ठाकरे काहीही बोलू शकतात पण आम्ही शत्रू नक्कीच नाही. मग आमचा पक्ष आणि आमची विचारसरणी भलेही वेगळी का असेना…असं जलील म्हणाले.
ईदच्या दिवशी राज ठाकरेंनी भेटीसाठी यावं असं निमंत्रण जलील यांनी केलं आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या आणि ठाण्याच्या जाहीर सभेत घेतला होता. ज्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगलं होतं. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात 3 मे ची डेडलाईन दिली होती. त्यामुळे तीन तारखेला राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ज्यांचा पक्षच ‘डेड’ झालाय ते काय ‘डेडलाईन’ देणार? संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेत आगामी काळात शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे सहकार्य करु असं सांगितलं आहे.
राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्याला निघण्यापूर्वी 150 ब्राह्मणांकडून पुण्यात पूजापाठ