Reshmi Nair: मॉडेलचं हनुमान मंदिर परिसरातच सेमी न्यूड Photoshoot, फोटो Viral होताच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Madhya Pradesh model reshmi nair obscene photoshoot in hanuman temple area police fir filed against her
Madhya Pradesh model reshmi nair obscene photoshoot in hanuman temple area police fir filed against her
social share
google news

Reshmi Nair obscene photoshoot: भोपाळ: अ‍ॅडल्ट अभिनेत्री आणि मॉडेल रेश्मी नायरने (Reshmi Nair) हनुमान मंदिर परिसरात अत्यंत अश्लील अशा स्वरूपाचं फोटोशूट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशच्या (Madhya pradesh) सागर जिल्ह्यातील प्रसिद्ध गढपहरा हनुमान मंदिर (Hanuman Mandir) परिसरात रेशमीने अश्लील फोटोशूट केले आहे. काही दिवसांपूर्वी ती गडपहरा येथे गेली होती. याच ठिकाणी असलेल्या रंगमहालमध्ये तिने अर्धनग्न फोटो काढल्याचा तिच्यावर आरोप केला जात आहे. तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. (model reshmi nair obscene photoshoot in hanuman temple area police fir filed against her)

यावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले आहे. तसेच रेश्मी नायरवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

मॉडेल रेश्मी नायरने मंदिर परिसरात केले अश्लील फोटोशूट

गढपहरा किल्ला परिसरात हनुमान आणि अनगढ देवी अशी दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत. इथेच रेशमीने फोटोशूट केलं आहे. आतापर्यंत बिकिनी मॉडेल रेश्मी नायरने अनेक सेमी न्यूड फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील बहुतांश शूटिंग शीशमहल, बारादरी आणि रंगमहालमध्ये झाले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> शिंदेंच्या शिवसैनिकांची भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, कल्याणमध्ये काय घडलं?

गढपहरा किल्ल्यावर केले अश्लील फोटोशूट

शिवसेना उपप्रदेशप्रमुख पप्पू तिवारी म्हणाले की, रेश्मी नायरने मंदिर परिसराजवळील किल्ल्याच्या आवारात अश्लील फोटोशूट केले आहे, जे निषेधार्ह आहे. यामुळे सनातनप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. आवारात असे कृत्य करणे योग्य नाही.

हा हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीवर हल्ला

पोलिसांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, ‘अश्लिलता दाखवणाऱ्या गोष्टी तसेच हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीवर हल्ला करणाऱ्या गोष्टी सागर जिल्ह्यात कुठेही आम्ही दाखवू देणार नाही. रेश्मी नायर आणि तिच्या सहकाऱ्यांवर लवकरच कारवाई न झाल्यास बुंदेलखंडसह सागर जिल्ह्यात निदर्शने करण्यात येतील.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, लोकलखाली चिरडून मृत्यू

मॉडेल रेश्मी नायर आणि तिचा नवरा सापडला वादात

मॉडेल रेश्मी नायर ही नेहमीच वादात असते. ‘किस फॉर लव्ह’ मोहिमेदरम्यान ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 2019 साली त्याच मोहिमेमध्ये या मॉडेलला आणि तिच्या पतीला बंगळुरूच्या अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT