Raut: ‘साहेब मी गद्दार नाही’; बाळासाहेबांना अभिवादन, 40 आमदारांना इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘साहेब मी गद्दार नाही’, असं ठळक आणि मोठ्या अक्षरात असलेली जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालीये. ही जाहिरात आहे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची. 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि यानिमित्ताने संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. या निमित्ताने संजय राऊतांनी एक निर्धारही व्यक्त केलाय.

बाळासाहेब ठाकरे यांना खासदार संजय राऊतांनी अभिवादन केलं आहे. सामना वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यावर खासदार संजय राऊत यांच्याबरोबरच विक्रोळीचे ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचंही नाव आहे. 40 बंडखोर आमदारांना पराभूत करण्याचा निर्धारही राऊतांनी व्यक्त केलाय.

MLC election 2023 : मविआ, युतीचे उमेदवार बाळासाहेब ठाकरेंनाच विसरले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने… -संजय राऊत

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना म्हटलंय की, ‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केलं याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद… जय महाराष्ट्र.’

ADVERTISEMENT

बाळासाहेबांना अभिवादन… 40 आमदारांना गटाला इशारा

संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना शिंदे गटाला धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतले 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. शिंदे गटात गेलेल्या या 40 आमदारांनाच गाडण्याची भाषा संजय राऊतांनी केलीये.

ADVERTISEMENT

Thackeray यांचा प्लॅन, कदम पिता-पुत्रांना धक्का? बड्या नेत्याची घरवापसी?

उद्धव ठाकरे काय बोलणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे आणि इतर नेते गेटवे ऑफ इंडिया येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत.

Shiv Sena : ठाकरे-शिंदेंना अजून वाट बघावी लागणार! आयोगात आज काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष असेल. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल ठाकरे शिवसैनिकांसमोर काय भूमिका मांडणार? हेही महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT