मुंबई: शारीरिक संबंधासाठी अल्पवयीन मुलीला पैसे देणं, तिचा हात पकडणं हा देखील POCSO गुन्हा... हायकोर्टाचं निरीक्षण

मुंबई तक

अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंधाच्या बदल्यात पैशांचं आमिष देणं आणि तिचा हात पकडून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी भाग पाडणं, हा पॉक्सो (POCSO)कायद्याच्या श्रेणीत येत असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबई हायकोर्टाचं मोठं निरीक्षण...
मुंबई हायकोर्टाचं मोठं निरीक्षण...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शारीरिक संबंधासाठी अल्पवयीन मुलीला पैसे देणं हा देखील POCSO गुन्हा...

point

मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण

Mumbai News: मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने पॉक्सो गुन्ह्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोणत्याही अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंधाच्या बदल्यात पैशांचं आमिष देणं आणि तिचा हात पकडून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी भाग पाडणं, हा पॉक्सो (POCSO)कायद्याच्या श्रेणीत येत असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 2019 मध्ये ट्रायल कोर्टाने दोषी ठरवलेल्या यवतमाळमधील एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना न्यायालयाने हे निरीक्षण स्पष्ट केलं. 

शारीरिक संबंधाच्या प्रस्तावासाठी पीडितेवर दबाव... 

संबंधित प्रकरण हे ऑक्टोबर 2015 मधील आहे. 13 वर्षीय पीडिता घरी एकटीच असताना आरोपी तरुण तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी, त्या तरुणाने मुलीला 50 रुपयांचं आमिष दाखवून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु, पीडितेने आरडाओरडा करत पीडितेच्या मागणीला विरोध केला. मात्र, काही वेळानंतर आरोपी पुन्हा तिच्या घरी आला आणि मुलीचा हात पकडून त्याने त्याचा घाणेरडा प्रस्ताव स्विकारण्यासाठी पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिच्या आईला तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाबद्दल सांगितलं. 

हे ही वाचा: क्राइम पेट्रोल बघून पळून जाण्याचा प्लॅन... 24 दिवसांनंतर दोघी पंजाबमध्ये सापडल्या, तरुणींच्या 'या' कृत्यामागचं कारण काय?

न्यायलयाने केलं स्पष्ट   

पुराव्यांच्या आधारे, ट्रायल कोर्टाने आरोपीला POCSO कायद्यांतर्गत दोषी ठरवलं. आरोपीने कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि उच्च न्यायालयात अपील दाखल केलं. परंतु न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी स्पष्टपणे सांगितले की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला चुकीचं कृत्य प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचं पुरावे आणि परिस्थितीवरून सिद्ध होत आहे. 

हे ही वाचा: खेळत असताना 6 वर्षांच्या मुलीला उचलून नेलं अन् शेतात नेऊन लैंगिक अत्याचार! 'त्या' अवस्थेत सोडून फरार...

यामुळे, पीडितेला कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही, त्यामुळे तो लैंगिक अत्याचार मानला जाऊ शकत नाही, हा आरोपीचा युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp