मुंबईची खबर: 5 मार्चपासून मुंबईत खाजगी बस सेवा बंद... बस मालकांचा 'ऑफ-रोड' आंदोलनाचा इशारा
ई-चलान प्रणालीच्या कथित चुकीच्या आणि अस्पष्ट वापराच्या निषेधार्थ मुंबई बस मालक संघटनेने 5 मार्चपासून अनिश्चित काळासाठी 'ऑफ-रोड' आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
5 मार्चपासून मुंबईत खाजगी बस सेवा बंद...
बस मालकांचा 'ऑफ-रोड' आंदोलनाचा इशारा
Mumbai News: ई-चलान प्रणालीच्या कथित चुकीच्या आणि अस्पष्ट वापराच्या निषेधार्थ मुंबई बस मालक संघटनेने 5 मार्चपासून अनिश्चित काळासाठी 'ऑफ-रोड' आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिली आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर खाजगी बस सेवा बंद केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे मुंबईतील मोठ्या संख्येने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.
केंद्रीय सचिव के. व्ही. शेट्टी यांनी दिली माहिती
केंद्रीय सचिव के. व्ही. शेट्टी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस (शाळा, कर्मचारी आणि प्रवासी) ट्रेलर फेडरेशन, मुंबई बस मालक संघटना आणि इतर संघटनांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स कृती समितीमार्फत हे आंदोलन केलं जाईल. मुंबई महानगर प्रदेशात जवळपास 25,000 ते 30,000 खाजगी बसेस (शाळा, कॉर्पोरेट आणि प्रवासी सेवा) चालतात. जर हे आंदोलन यशस्वी झालं तर त्याचा शालेय विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांवर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बेस्ट बसेस हा एकमेव उपाय असू शकतो.
हे ही वाचा: पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य
के. व्ही. शेट्टी यांनी असं स्पष्ट केलं की, "ई-चलान प्रणाली चुकीच्या पद्धतीने आणि स्पष्ट नियमांशिवाय वापरली जात आहे. शिवाय, अंमलबजावणीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे आणि सुरक्षिततेच्या नावाखाली रेट्रोफिटिंग नियम जबरदस्तीने लागू केले जात आहेत. या मुद्द्यांचाच निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल."
हे ही वाचा: नागपूर: परीक्षेच्या तासाभरापूर्वी पेपर व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला... 12 वीचे फिजिक्स-केमिस्ट्रीचे पेपर फुटले!
असोसिएशनचं शाळा आणि संस्थांना आवाहन
बस मालकांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी आणि चर्चा करूनही, संबंधित राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी ठोस उपाय करण्यात अपयशी ठरलं आहे. सध्याच्या कारवाईमुळे वाहतूक व्यवसायावर आर्थिक दबाव वाढत आहे आणि कामकाजात अनिश्चितता निर्माण होत आहे. असोसिएशनने कंपन्या आणि संस्थांना 5 मार्चपासून कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी प्रवास व्यवस्था करण्याचं आवाहन केलं आहे. शाळा प्रशासन आणि पालकांनाही विद्यार्थ्यांच्या देखभालीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.










