Nawaz Modi: “मला, मुलीला लाथा घातल्या, अंबानींनी वाचवलं”, रेमंडच्या मालकावर पत्नीचे गंभीर आरोप
नवाज मोदी यांनी रेमंडचे उद्योग समूहाचे मालक गौतम सिंघानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असे नवाज मोदींनी म्हटले आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी घडलेली संपूर्ण घटना नवाज मोदींनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितली.
ADVERTISEMENT

Nawaz Modi-Singhania News : गेल्या काही दिवसांपासून एका प्रतिष्ठित कुटुंबातील पती-पत्नीतील वाद प्रसिद्धीच्या झोतात आलाय. हा वाद आहे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील. दोघे घटस्फोट घेणार आहे आणि या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. नवाज मोदींनी गौतम सिंघानिया यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवाज यांनी सिंघानिया यांच्या सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या संपत्तीतील 75 टक्के हिस्सा दोन मुली आणि स्वतःला देण्याची मागणी केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा आरोप केला आहे.
नवाज मोदी-सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यातील कौटुंबिक वाद सध्या चर्चेत आहे. याच वादाला नवं वळणं मिळालं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नवाज मोदी यांनी रेमंडचे मालक आणि त्यांचे पती गौतम सिंघानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवाज मोदी म्हणाल्या की, “गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलीवर हल्ला केला. दोघांनी लाथा, बुक्क्या मारल्या. गौतम सिंघानिया हे मला आणि अल्पवयीन मुलगी निहारिका हिला सुमारे 15 मिनिटे मारहाण केली”, असा दावा त्यांनी केला आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत अचानक हल्ला
नवाज मोदी असा आरोप केला आहे की, “9 सप्टेंबर रोजी गौतम सिंघानियांच्या वाढदिवसाची मुंबईतील घरी पार्टी होती. पार्टीनंतर (10 सप्टेंबर) पहाटे 5 वाजले होते, तेव्हा मी आणि माझ्या दोन मुली आणि त्यांच्या काही मित्रांसह उपस्थित होतो. त्यावेळी सिंघानीयांनी अचानक हल्ला केला. नंतर गौतम सिंघानीया गायब झाले. मी मुलीला ओढत दुसऱ्या खोलीत नेले.”










