Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…
Marathi News Breaking: दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल हांडोरे याने आता नवी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली आहे. तसेच त्याच्या हातून जे निर्घृण कृत्य घडलं त्याबाबत त्याने पश्चातापही व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

Darshana Pawar Murder: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसरा क्रमांक पटकावणारी दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरेच्या (Rahul Handore) अटकेनंतर या प्रकरणातील नवनवी माहिती आता समोर येत आहे. याच विषयी मुंबई Tak च्या हाती आता आणखी एक नवी माहिती लागली आहे. ज्याविषयी आपण सविस्तरपण जाणून घेऊया. नुकतीच दर्शनाची वनविभागात क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली होती. पण नियुक्तीच्या आधीच तिचा मित्र राहुल हांडोरे याने 12 जून 2023 रोजी तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली. याच प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरेची आता चार दिवसाची पोलीस कोठडी संपली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी चार दिवस विविध प्रकारे या प्रकरणाची चौकशी केली आहे. आरोपी राहुलकडून घटनाक्रम जाणून घेतला आहे. (pune mpsc passed darshana pawar murder case rahul handore accused pune rural police expressed regret heinous act marathi news breaking)
याशिवाय संपूर्ण क्राईम सीन सुद्धा रिक्रिएट करण्यात आला होता. राहुल हांडोरेने पोलिसांना त्याच ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी.. म्हणजे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथे त्याने दर्शनाची हत्या केली.
राहुल हांडोरे म्हणतो मला आता पश्चाताप…
‘यावेळी आरोपी राहुल हांडोरेने पोलिसांनी हे देखील सांगितलं की, आज त्याला प्रचंड पश्चाताप होत आहे. यावेळी तो असंही म्हणाला की, हे जे कृत्य घडलं ते त्याला कधीही करायचं नव्हतं.
राजगडाच्या पायथ्याशी काय घडलं?
हत्येच्या दिवशी म्हणजे 12 जून रोजी पुण्यातून निघाल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी साधारण 8.30 च्या सुमारास पोहचले. हे अंतर पुण्यापासून साधारण 65 किमी आहे. तिथे पोहचल्यावर त्याने नाश्ता केला. याच दरम्यान राहुलने दर्शनाला परत एकदा प्रेमाचा प्रस्ताव, लग्नाचा प्रस्ताव पुढे ठेवला. पण तिने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला. बाचाबाची झाली.