पुण्यात तरूणीवर बलात्कार.. अजितदादांच्या पक्षाचा माजी पदाधिकारी मुख्य आरोपी, घटना काय?
पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी कुकडेने पीडितेची ओळख त्याच्या मित्रांशी करून दिली. त्यांनी तिच्या घरी जाणं येणं वाढवलं आणि नंतर तिला लोणावळा, रायगड आणि पानशेतसह विविध ठिकाणी घेऊन जायला लागले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात संतापजनक घटना, भूतानमधील तरूणीवर अत्याचार
शिक्षणासाठी पुण्यात राहत होती भूतानमधील तरूणी
तरूणीला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं
Pune News : भूतानमधील एका 27 वर्षीय तरूणीवर पुण्यात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सात जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) माजी नेते शंतनू कुकडे यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा >> करूणा मुंडे आहेत तरी कोण? आतापर्यंत धनंजय मुंडेंना कसं आणलं अडचणीत.. पाहा A टू Z माहिती
भुतानमधील ही महिला 2020 पासून ही तरूणीवर पुण्यात राहते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समर्थ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कुकडे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींमध्ये ऋषिकेश नवले, जालंदर बडाडे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, वकील विपिन बिडकर, सागर रसगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेनन यांचाही समावेश आहे.
पीडिता सुरुवातीला 2020 मध्ये शिक्षण आणि कामासाठी बौद्धगया इथे आली होती. नंतर ती पुण्यात आली. पुण्यात ती ऋषिकेश नवले यांच्या संपर्कात आली. ऋषिकेशने तिची ओळख शंतनू कुकडेशी करून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडेने तिला शिक्षणात मदत करण्याच्या बहाण्याने राहण्याची व्यवस्था आणि आर्थिक मदत केली. त्यामुळे तरूणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
हे ही वाचा >> खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं, अत्याचार करुन चिमुकलीला संपवलं, मैत्रीणीने सगळं सांगितलं
पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी कुकडेने पीडितेची ओळख त्याच्या मित्रांशी करून दिली. त्यांनी तिच्या घरी जाणं येणं वाढवलं आणि नंतर तिला लोणावळा, रायगड आणि पानशेतसह विविध ठिकाणी घेऊन जायला लागले. इथेच पीडितेसोबत गैरकृत्य करायला सुरूवात केली. या प्रकरणातील आरोपींपैकी एक जण डीजे आहे तर दुसरा व्यवसायाने वकील आहे.










