पुण्यातील बुधवार पेठेत महिलेनं 9 व्या मजल्यावरून उडी घेत स्वत:ला संपवलं, ' मला या कामाचा..' चिठ्ठीत होतं आत्महत्येचं कारण
pune news : पुणे शहरातील बुधवार पेठेत एक मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेनं सासरकडून होणाऱ्या कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे शहरातील बुधवार पेठेत मन सून्न करून टाकणारी घटना
सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण
Pune News : पुणे शहरातील बुधवार पेठेत एक मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेनं सासरकडून होणाऱ्या कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. तिनं 9 व्या मजल्यावरून उडी घेत स्वत:ला संपवलं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी 6:40 वाजता घडली. या घटनेची माहिती आज 28 नोव्हेंबर रोजी समोर आली. आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचं नाव मानसी घारे (वय 19) असे आहे.
हे ही वाचा : बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध, पण घरच्यांनी दुसरीकडेच ठरवलं लग्न! अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...
आत्महत्या करणाऱ्या महिलेनं भगवान गोपाल घारे (वय 23) तरुणाशी विवाह केला होता. तो मूळचा जामखेडचा रहिवासी होता. तिच्या सासरचे लोक त्याच ठिकाणी कॅन्टीनचे काम करायचे. दरम्यान, एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण घोडके म्हणाले, ही महिला मूळची अहिल्यानगरची रहिवासी आहे. तर तिचा विवाह हा एका वर्षांपूर्वी भगवान गोपाल घारे याच्याशी झाला होता. नंतर तिनं आपला संसार पुण्यात थाटला.
सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असता, राहत्या घरात एक सुसाईड नोट सापडली, ज्यात तिनं लिहिलं की, 'मी माझ्या घरातल्या लोकांना योग्यतेची वाटत नाही. मला या कामाचा कंटाळा आला आहे, मी स्वत:हून आत्महत्येचं पाऊल उचलत आहे,' असं त्या सुसाईड नोटमध्ये तिनं नमूद केलं होतं. तिनं इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी घेत स्वत:ला संपवलं.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात एफआरआय दाखल झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील शोध सुरु ठेवला आहे.










