पुण्यातील 'मारणे टोळी'ची सूत्र चालवणाऱ्या रुपेश मारणेला अटक, 9 महिन्यांपासून होता फरार
Pune Crime : पुण्यातील 'मारणे टोळी'ची सूत्र चालवणाऱ्या रुपेश मारणेला अटक, 9 महिन्यांपासून होता फरार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यातील 'मारणे टोळी'ची सूत्र चालवणाऱ्या रुपेश मारणेला अटक, 9 महिन्यांपासून होता फरार
मारहाण प्रकरणात गजानन मारणेसह रूपेश मारणे याच्यावर गुन्हा दाखल होता
पुणे : पुण्यातील गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य आणि गुंड म्हणून ओळखला जाणारा रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोथरूड पोलिसांनी आंदगाव (ता. मुळशी) येथून रुपेश मारणेला सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली आहे.
आंदगाव परिसरात धाड टाकत रुपेश मारणेला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते, मात्र तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कोथरूड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंदगाव परिसरात धाड टाकत त्याला जेरबंद केले.
हेही वाचा : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, 12 राज्यांमध्ये सुरू होणार SIR चा दुसरा टप्पा.. महाराष्ट्राबाबत काय ठरलं?
रूपेश मारणे आणि गजानन मारणे यांच्यावर कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर गजानन मारणे याला पोलिसांनी आधीच अटक केली होती, मात्र रूपेश मारणे हा फरार राहिला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गजानन मारणे तुरुंगात गेल्यानंतर रूपेश मारणे हा 'मारणे टोळी'चे सूत्र स्वतःकडे चालवत होता. टोळीतील अनेक गुंडांशी त्याचे संबंध असून, परिसरातील खंडणी व दहशतीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.










