Rain Update : मुंबईसह महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार, बाप्पाच्या आगमनालाच बरसणार मुसळधार

ADVERTISEMENT

rain update mumbai vidrbh heavy rain
rain update mumbai vidrbh heavy rain
social share
google news

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आजपासून पुन्हा हजेरी लावली आहे. देशातील अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यानुसार मध्य भारतात 17 सप्टेंबरपर्यंत आणि पश्चिम भारतात 18 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातसह महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवस मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे. त्या बरोबरच मध्य प्रदेश आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राजधानीतही जोरदार बरसणार

पावसासंदर्भात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबर रोजी किमान तापमान 25 अंश तर कमाल तापमान 33 अंशांपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नवी दिल्लीतही हलका पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. तर रविवारीही दिल्लीसह परिसरात हलका पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut : ‘बॅनरवर हुतात्म्यांचे फोटो नाहीत, ठगांचे फोटो’, राऊतांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील हवामानाविषयी माहिती देताना सांगितले आहे की, शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रविवारी आणि सोमवारी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असणार आहे. तर मुंबईतही शनिवार, रविवार आणि सोमवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> चालत्या बाईकवर त्या जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, ट्रॅफिक पोलिसांनी काय केलं पाहा

या राज्यातही शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व राजस्थानमध्येही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांसर या परिसरात मुसळधार पावसाबरोबरच काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT