RSS on Caste Census : जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आरएसएसची जातनिहाय जनगणनेबद्दल नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल स्पष्टपणे निवदेन केले आहे.
ADVERTISEMENT

Caste Based Census RSS : देशातून जातीय विषमता नष्ट करायची असेल, तर जातनिहाय जनगणना व्हायला नको, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली होती. यावरून वाद-विवाद सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नव्याने भूमिका मांडली आहे. आरएसएसने जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देताना एक सूचना केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणनेबद्दल काय मांडली भूमिका?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यातून त्यांनी आरएसएसची जातनिहाय जनगणनेबद्दलची भूमिका मांडली आहे. वाचा काय म्हटलंय निवेदनात…
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि विषमता मुक्त समरसता तसेच सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत आहे. हे खरं आहे की, विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे पडले आहेत.”
हेही वाचा >> ‘त्याचं भान मुख्यमंत्र्यांना नसेल’, राऊतांनी शिंदेंनाच दिलं चॅलेंज
“त्यांचा विकास, उत्कर्ष आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी अनेक योजना आणि तरतुदी केल्या. त्याचं संघ पूर्णपणे समर्थन करतो. मागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.”