Rohit Pawar : “मी एकटा बाहेर नाही निघणार, तर…”, रोहित पवारांनी सांगितलं प्रकरण

भागवत हिरेकर

महाराष्ट्र शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीची चौकशी सुरू आहे. रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना एक मोठं विधान केले.

ADVERTISEMENT

what is first Reaction of Rohit pawar on ed summons?
what is first Reaction of Rohit pawar on ed summons?
social share
google news

Rohit Pawar ED : शरद पवारांसोबत असलेले आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. रोहित पवार या चौकशीला जाणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याबद्दल खुलासा केला. (Rohit Pawar First Reaction on ED Summons)

विधान भवनात रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीकडून चौकशी केल्या जात असलेल्या प्रकरणाची माहिती दिली.

ईडीच्या कारवाईबद्दल रोहित पवारांनी काय सांगितलं?

ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले, “ईडीच्या विरोधात कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही. ईडीने जी कागदपत्रे मागितली, ती दिली आहेत. यापुढेही देऊ. उद्या सकाळी १०.३० वाजता मी जाणार आहे. शरद पवारांनी सांगितले की, मी सुद्धा तिथे राष्ट्रवादी भवनमध्ये असणार आहे. शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दामहून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल आणि शरद पवारांसारखी व्यक्ती ज्याला बाप माणूस म्हणतो. ती सोबत असेल तर हुरुप येतो. सुप्रिया सुळेही आहेत. आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका. आजपर्यंत जे सहकार्य ईडीला केलं आहे, तसंच सहकार्य उद्याही करेन. जे कुठले प्रश्न असतील, त्यांना योग्य उत्तरं देईन.”

माझी केस थोडी वेगळी आहे -रोहित पवार

राजकीय दबाव टाकण्यासाठी ईडीची कारवाई होतेय का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, “तुम्ही हाच प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य लोकांना विचारला, तर त्यांचं हेच मत येतं की, मईडीची कारवाई सुरू झाली. त्याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या. माझी केस जी आहे, ती थोडी वेगळी आहे. माझी जी चौकशी सुरू आहे, ती महाराष्ट्र सहकारी बँकेशी संबंधित आहे. यात माझाच कारखाना आहे, असं नाही. यामध्ये ६०-७० लोकांचे कारखाने आणि कंपन्या आहेत.”

हे वाचलं का?

    follow whatsapp