Samruddhi Mahamarg Accident : ‘ना टायर फुटला, ना स्पीड जास्त’, असा झाला बस अपघात
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. बसचा अपघात होण्यामागची काही कारणे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT

Samruddhi Mahamarg Accident News Today Marathi : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 25 प्रवासी जळून राख झाले. खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आणि बस जळून खाक झाली. या दुर्घटनेनंतर इतका मोठा अपघात कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होतोय. सुरुवातीला बसचे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचं म्हटलं गेलं, मात्र तसं काही घडलंच नसल्याचे पाहणी अहवालातून समोर आलंय. त्याचबरोबर अपघाताचं कारणाबद्दलही रिपोर्टमध्ये नोंद करण्यात आली आहे. (Samruddhi Mahamarg travel bus accident reason)
समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जीव गेले. या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार असून, अपघातानंतर परिवहन खात्याने केलेल्या पाहणीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
Video >> Buldhana बस अपघातातून बचावलेला प्रवाशी काय म्हणाला?
परिवहन विभागाच्या पाहणी रिपोर्टमध्ये बस अपघातात कसा झाला, याबद्दल निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार विदर्भ ट्रॅव्हल्सची बस (एमएच 29, बीई 1819) नागपूर पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही बस पिंपळखुटा गावाजवळ अपघातग्रस्त झाली.
Video >> अवंती पोहनकरची ती भेट शेवटची ठरली, शेजारी काय म्हणाले?
समृद्धी महामार्गावरील मधल्या लेनवर बस असायला हवी होती, पण चालकाने दिलेल्या माहितीनुसार बस उजव्या लेनवरून जात होती. बस आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या उजव्या बाजूच्या स्टीलच्या खांबाला धडकली. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.