Nagpur Rain: नागपुरात ढगफुटी… चार तासात तुफान पाऊस, शहरात पुरामुळे भीषण परिस्थिती

योगेश पांडे

Nagpur Flood: नागपुरात रात्रभर बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव तुडुंब भरल्याने संपूर्ण शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या काही तासात पावसाने संपूर्ण नागपुरात दाणादाण उडवली आहे.

ADVERTISEMENT

100 mm rain in just 4 hours in nagpur flood water entered city dcm devendra fadnavis informed about flood situation on twitter
100 mm rain in just 4 hours in nagpur flood water entered city dcm devendra fadnavis informed about flood situation on twitter
social share
google news

Nagpur Flood: नागपूर: नागपुरात (Nagpur) काल (22 सप्टेंबर) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात काल रात्री अवघ्या काही तासात 106 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. त्यामुळे नागपुरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. रात्री अचानक आलेल्या पावसाने प्रसिद्ध अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झाला त्यामुळे पावसाचं पाणी नागपूर शहरात शिरलं आणि सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. (100 mm rain in just 4 hours in nagpur flood water entered city dcm devendra fadnavis informed about flood situation on twitter)

अचानक आलेल्या या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. तर मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने आज (23 सप्टेंबर) शाळांना-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या मोर भवन बस डेपोमध्ये एक बस बुडाली असून नागपूर महानगरपालिका, नागपूर गोरेवाडा यांच्याकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp