12 February 2025 Gold Rate : थांबा जरा..लग्नसराईत सोनं-चांदी खरेदी करताय? मुंबईसह 'या' शहरांतील भाव तर वाचा

मुंबई तक

Today Gold And Silver Price : सोन्याच्या किंमतीत आज बुधवारी किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर 87390 रुपयांवर पोहोचले आहेत.

ADVERTISEMENT

सोने चांदीचा दर (प्रतिनिधी प्रतिमा).
सोने चांदीचा दर (प्रतिनिधी प्रतिमा).
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनं खरेदी करताय? आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Today Gold And Silver Price : सोन्याच्या किंमतीत आज बुधवारी किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर 87390 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाल्याने चांदीचे प्रति किलोचे दर 99400 रुपये झाले आहेत. 

मागील काही दिवसांत सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 86360 रुपयांवर पोहोचली होती. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात उलथापालथ झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली होती. अमेरिकी डॉलरमध्ये मजबूती आणि व्याज दरात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत बदल झाल्याचं समोर आलंय. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

दिल्ली 

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80260 रुपयांवर पोहोचले आहेत.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87390 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80110 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp