Exclusive: 17 तास ED ची धाड, सूरज चव्हाणचे WhatsApp चॅट्स आले समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

ed raid suraj chavan whatsapp chats covid centre scam shiv sena ubt aaditya thackeray
ed raid suraj chavan whatsapp chats covid centre scam shiv sena ubt aaditya thackeray
social share
google news

Marathi News Breaking: मुंबई: मुंबईत (Mumbai) काल अंमलबजावणी संचलनालय (ED) ने 10 ते 12 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. आज सुद्धा धाडींचे सत्र सुरू आहे. ज्यांच्यावर काल ईडीने धाडी टाकल्या होत्या ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) जे आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय समजले जातात. त्याच सूरज चव्हाण यांच्या राहत्या घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट देखील घेतली आहे. ज्या ठिकाणी 17 तास ईडीचा छापा सुरू होता. याच छापेमारीत ईडीला नेमकं काय मिळालं याची Exclusive माहिती मुंबई Tak च्या हाती लागली आहे. (17 hours ed raid suraj chavan whatsapp chats covid centre scam shiv sena ubt aaditya thackeray mumbai tak exclusive)

17 तासांच्या धाडीत ED च्या हाती काय लागलं?

ईडीची जी चौकशी झाली त्यात असं आढळून आलं आहे की, मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोविड काळात मृतदेहांना सील करण्यात ज्या बॅग विकत घेण्यात आल्या होत्या त्या बॅग खरेदीत महापालिकेकडून मोठा घोटाळा झाल्याचं ईडीच्या चौकशीतून समोर आलं आहे.

मृतदेह सील करण्यासाठी जी बॅग होती त्याची मूळ किंमत ही दोन हजार रुपये होती. ती एक बॅग बीएमसीने 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘डिलिव्हरी बॉय’चे काम करून MPSCची तयारी; राहुल हंडोरे इतका क्रूर का झाला?

याशिवाय अनेक गोष्टींमध्ये अनियमितता झाली असल्याचं ईडीच्या छापेमारीतून समोर आलं आहे.

ईडीच्या छापेमारीत काय-काय सापडलं?

  • कोविड मृतदेहासाठीच्या बॅग्स 2000 रूपयांत एक कंपनी देत असताना, BMC ला सप्लाय करणाऱ्या कंपनीने मात्र 6800 ला विकले. हे कंत्राट महापौरांच्या सांगण्यावरून देण्यात आलं.
  • कोविडच्या उपचारांमधली औषधे BMC ला ज्या दरांमध्ये मिळत होती, त्याच्या 25-30 टक्के कमी दराने ती बाजारात उपलब्ध होती. हे लक्षात आणून दिल्यानंतरही BMC च्या अधिकाऱ्यांनी पावलं उचलली नाहीत.
  • BMC ला बिलामध्ये जेवढं दाखवण्यात आलं त्यापेक्षा 60-65 टक्क्यांपेक्षा कमी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते.
  • कंपनी अशा डॉक्टरांची नावं बिलामध्ये दाखवत होती, जे डॉक्टर्स काम करतच नव्हते. पण भासवण्यात असं आलं की ते लाईफलाईन जम्बो कोविड सेंटमध्ये काम करत आहेत.
  • 21 जूनला टाकलेल्या धाडीत 68.65 कोटींची रोख रक्कम, महाराष्ट्रातल्या 50 स्थावर मालमत्तांबाबतची कागदपत्रं ज्याची किंमत 150 कोटींहून अधिक आहे.
  • 15 कोटींचे FD/गुंतवणुकीची कागदपत्रं
    2.46 कोटींचे दागिने
    याशिवाय इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मोबाईल फोन, लॅपटॉप

सूरज चव्हाणच्या चॅट्स नेमकं काय सापडलं?

सूरज चव्हाणचे जे चॅट्स सापडले आहेत त्यानुसार. जे लाईफलाईनच्या भागीदारांसोबतचे होते. ED ला असा संशय आहे की, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट फर्मला BMC कडून कंत्राट मिळावं यासाठी सूरज चव्हाण प्रभाव टाकत होता.

ADVERTISEMENT

Covid Centre scam प्रकरण आहे तरी काय?

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मच्या भागीदारांनी वैद्यकीय सेवा पुरवण्याचा कोणताही अनुभव नसताना बनावट कागदपत्रे मुंबई महापालिका आणि पीएमआरडीएला दिली आणि जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune : दर्शना पवारचा खून करुन बंगालला गेला.. राहुल हांडोरेला मुंबईत कसं पकडलं?

पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा व स्टाफ पुरवण्याचे काम लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे होते. पण, तिथे मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. याच केंद्रात पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका आणि सरकारने समिती नेमली. चौकशीत या कंपनीला वैद्यकीय सेवा पुरवण्याचा अनुभव नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीचे कंत्राट रद्द करतानाच समितीने या कंपनीला कंत्राट न देण्याचे बजावले होते. असं असतानाही मुंबई महापालिकेने जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला दिले.

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने वरळीतील एनएससीआय जम्बो कोविड सेंटर आणि दहिसर जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. सोमय्यांच्या आरोपानुसार कंपनीने कोविड सेंटरला पुरवलेल्या सेवेबद्दल मुंबई महापालिकेकडे 38 कोटींचे बिले दिली आणि पैसे मिळवले. या कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारेच मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स जम्बो कोविड सेंटर आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटरचेही कंत्राट मिळवले.

सोमय्यांच्या म्हणण्यानुसार दुसरीकडे इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपी या फर्मनेही जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा सादर केल्या. या कंपनीमध्ये सुजित मुकुंद पाटकर आणि राजू नंदकुमार सांळुखे हे भागीदार आहेत. यात संदिप हरिशंकर गुप्ता, योगेश्वर भूमेश्वर उल्लेंगल्ला, अपर्णा श्रीकांत पंडितही भागीदार असल्याचा दावा सोमय्यांनी केलेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT