20 वर्षाच्या तरुणाचा खेळता खेळता गेला जीव, क्रिकेटच्या मैदानावर काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

20 year old youth died due to heart attack in cricket ground aravali gujrat
20 year old youth died due to heart attack in cricket ground aravali gujrat
social share
google news

देशभरात हार्ट अटॅकने (Heart Attack) मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. या घटना सध्या तरूणांमध्ये (Boy) जास्त आढळत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. आता अशीच घटना एक घटना गुजरातच्या अरावलीमधून समोर आली आहे. या घटनेत क्रिकेट (Cricket) खेळता खेळता एका तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (20 year old youth died due to heart attack in cricket ground aravali gujarat)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीच्या मोडासा दीप क्षेत्रच्या गोवर्धन सोसायटीतील तीर्थ अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहतो. या कुटुंबातील 20 वर्षाचा तरूण हा मैदानात क्रिकेट खेळत होता. यावेळी क्रिकेट खेळता खेळता तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे. हा तरूण अवघ्या 20 वर्षाचा होता, तसेच तो इंजिनियरिंगचा अभ्यास देखील करत होता. मात्र आता क्रिकेट खेळताना त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर

रूग्णालया बाहेर झाला मृत्यू

दरम्यान याआधी सुरेंद्र नगरच्या पाटडी शहरात भाजप उपाध्यक्ष आणि नगर पालिकेचे माजी नगरसेवक राजूभाई ठाकोर यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. राजूभाई ठाकोर हे त्यांच्या मित्रांसोबत चर्चा केल्यानंतर उशीरा रात्री घरी पोहोचले होते. यावेळी अचानक त्यांना छातीत दुखु लागले होते. यामुळे त्यांनी लगेच बाईक काढून रूग्णालय गाठले होते. मात्र रूग्णालयाबाहेर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. याआधी राजकोटमध्ये एका 50 वर्षीय महिलेचा मुलाच्या लग्नात हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.

हे वाचलं का?

गुजरातच्या अहमदाबादमध्ये याआधी एका क्रिकेट मॅच दरम्यान जीएसटी कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीतील कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेल्या सामन्या दरम्यान ही घटना घडली होती. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि ते खाली कोसळले होते. एका रिपोर्टनुसार गुजरातमध्ये एका महिन्यात सात जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : Crime: शेजारणीवर बलात्कार, आरोपीच्या बायकोने तर पीडित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य…

तेलंगनाच्या नांदेडमध्ये देखील एका युवकाचा डान्स करता करता हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. त्याचे वय अवघे 19 वर्ष होते. 25 फेब्रुवारीला ही घटना घडली होती. तेलंगनातील हार्ट अटॅकची ही चौथी घटना आहे. याआधी 22 फेब्रुवारीला जिम वर्कआऊट दरम्यान एका पोलीस कॉस्टेबलचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. दरम्यान गेल्या काही वर्षापासून देशात हार्ट अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेष म्हणजे 21 ते 30 वयोगटातील तरूणांचे हार्ट अटॅकने मृत्यू होत आहेत, ही फारच चिंतेची बाब आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT