5 December 2024 Gold Rate: काय सांगता! ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? मुंबईत आजचा सोन्याचा भाव काय?

मुंबई तक

Gold Rate In India: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याची ग्राहकांची लगबग सुरु झालीय. परंतु, सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
तस्वीर: एआय
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?

point

मुंबईत सोन्या-चांदीचे आजचे भाव काय?

point

सोन्या-चांदीचे आजचे दर वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

Gold Rate In India: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याची ग्राहकांची लगबग सुरु झालीय. परंतु, सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज 5 डिसेंबरला सोन्या-चांदीचे भाव फ्लॅट असल्याचं समोर आलंय. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 77 हजारांच्या पुढे गेलीय. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांपार झाली आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोनं आता लग्नसराईत स्वस्त होणार नाहीय. येणाऱ्या काळात सोनं-चांदी आणखी महाग होऊ शकतं. अशातच सोनं खरेदी करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. चांदीच्या भावातही आज घसरण झाली नाहीय. एक किलोग्रॅम चांदीचे भाव आता 91100 रुपये झाले आहेत. अशातच देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Mumbai Gold Rate : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77780 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. 

Kolkata Gold Rate : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77780 रुपये झाली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp